Homeबॅक पेज१६ फेब्रुवारीला जामनेरमध्ये...

१६ फेब्रुवारीला जामनेरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल!

महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. जामनेरच्या भूमीवर १६ फेब्रुवारीला ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’सोबत ‘देवाभाऊ केसरी’ ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती दंगल आयोजित करण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सुरू होणारा नमो कुस्ती कुंभ रात्री ८ वाजेपर्यंत एकापेक्षा एक लढतीचा थरार सादर करणार आहे.

‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दंगलीमध्ये भारत, फ्रान्स, मोल्दोवा, इराण, जॉर्जिया, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरीसारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. हे मोठे आयोजन मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कुस्ती दंगलीचे प्रमुख आयोजक महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्सुकता आणि उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्रात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा करण्यात येणार आहे. हे क्रीडा संकुल सामान्य घरातील खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा पुरवण्यासाठी मोठी भूमिका बजावेल. या दंगलीमुळे कुस्ती रसिकांसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या कुस्तीपटूंना एकाच मंचावर पाहण्याची ही अनोखी संधी लाभणार असल्यामुळे लाखो कुस्तीप्रेमींच्या नजरा आतापासूनच लागल्या आहेत.

Continue reading

१९ सप्टेेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘कुर्ला टू वेंगुर्ला’!

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षणात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट 'कुर्ला टू वेंगुर्ला' या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले...

वस्ताद वसंतराव पाटील यांना गुरुवर्य मल्लगुरु पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा फाऊंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५चे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये...

मुंबईत अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उद्यापासून

मुंबई महानगरातील नागरिकांना आरोग्याशी संबंधित सुलभ सेवा देण्यासाठी मुंबई महापालिकेने तंत्रज्ञानस्नेही पाऊल टाकले आहे. पालिकेकडून लवकरच भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरु करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिका संचालित स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी...
Skip to content