Homeएनसर्कलमसूर डाळीच्या साठ्याची...

मसूर डाळीच्या साठ्याची माहिती द्या, नाहीतर कारवाई!

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने मसूर डाळीच्या अनिवार्य साठ्याबाबत तत्काळ प्रभावाने माहिती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सर्व संबंधितांनी दर शुक्रवारी विभागाद्वारे व्यवस्थापित स्टॉक डिस्क्लोजर पोर्टलवर (https://fcainfoweb.nic.in/psp) त्यांच्याकडील मसूर डाळीची माहिती अनिवार्यपणे उघड करावी. कोणताही अघोषित साठा आढळल्यास तो साठेबाजी मानला जाईल आणि आवश्यक वस्तू कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल.

ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी साप्ताहिक मूल्य आढावा बैठकीदरम्यान विभागाला मसुराची बफर खरेदी अधिक व्यापक बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. किमान हमी भावाच्या जवळच्या किमतीत उपलब्ध साठा खरेदी करणे हे उद्दिष्ट आहे. ग्राहक व्यवहार सचिव म्हणाले की जेव्हा कॅनडामधून मसूराची आयात आणि आफ्रिकन देशांमधून तूर डाळीची आयात वाढत असताना काही प्रमुख कंपन्या ग्राहक आणि राष्ट्राच्या हिताच्या विरोधात बाजारपेठेत अनियमितता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि सणासुदीच्या काळात रास्त दरात सर्व डाळींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हा साठा बाजारात आणण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेईल.

ते पुढे म्हणाले की, ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचा समतोल राखण्याला सर्वोच्च प्राधान्य असून भारतीय ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या हिताला ठेच पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास विभाग मागेपुढे पाहणार नाही.

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content