Homeबॅक पेजहवामान बदलामुळे भारताचे...

हवामान बदलामुळे भारताचे तापमान वाढले .7 अंश सेल्सियसने!

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (एमओईएस) वर्ष 2020 मध्ये ‘भारतीय भूप्रदेशात झालेल्या हवामान बदलाचे मूल्यमापन’ हा अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये भारतीय उपखंडावर झालेल्या हवामान बदलाच्या परिणामाचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले आहे. वर्ष 1993 ते वर्ष 2017 या अडीच दशकांमध्ये दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी दर वर्षी 3.3 मिलिमीटर या वेगाने वाढत आहे तर वर्ष 1901 ते 2018 या कालावधीत भारताचे सरासरी तापमान सुमारे 0.7 अंश सेल्सियसने वाढले आहे.

या अहवालातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:

1.वर्ष 1901 ते 2018 या कालावधीत भारताचे सरासरी तापमान सुमारे 0.7 अंश सेल्सियसने वाढले आहे.

2.वर्ष 1950 ते 2015 हा कालावधीत दैनंदिन पर्जन्यमान अतिप्रमाणात (पर्जन्यमानाची तीव्रता प्रतिदिन दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक )होण्याची वारंवारता सुमारे 75%नी वाढली.

3.वर्ष 1951 ते 2015 या काळात दुष्काळ पडण्याची वारंवारता आणि दुष्काळाची क्षेत्रीय व्याप्ती लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.

4.वर्ष 1993 ते वर्ष 2017 या अडीच दशकांमध्ये दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी दर वर्षी 3.3 मिलिमीटर या वेगाने वाढत आहे.

5.वर्ष 1998 ते 2018 या काळात पावसाळ्यानंतर अरबी समुद्रात भयंकर चक्रीवादळ येण्याचे प्रमाण वाढले आहे.

भारतीय हवामान विभाग (आयएमडी)भारतीय भूप्रदेशातील हवामानावर नियमितपणे लक्ष ठेवून असते आणि हाती आलेल्या निरीक्षणावरून “वार्षिक हवामानविषयक सारांश’ या वार्षिक हवामानाचे प्रकाशन करते. आयएमडी मासिक हवामानविषयक सारांश अहवाल देखील जारी करत असते. वार्षिक हवामानविषयक सारांशामध्ये संदर्भित कालावधीतील तापमान, पाऊस, अतितीव्र हवामानविषयक घडामोडी यांच्याविषयीच्या माहितीचा समावेश असतो.

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content