Homeएनसर्कलरसभरीत प्रेमकथा सांगण्यात...

रसभरीत प्रेमकथा सांगण्यात भारतीय जोडपी अव्वलः करणार व्हिएतनामची टूर!

रसभरीत कथाकथन करण्यात भारतीयांचा हात कोणीही धरू शकत नाही. नवीन युगातली विमानवाहतूक कंपनी व्हिएतजेटने भारतातील जोडप्यांकरिता ‘लव्ह कनेक्शन २०२३’, या जोडप्यांच्या कथाकथनाची स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या चार महिन्यांच्या काळात या स्पर्धेत अनेक अद्वितीय रोमँटिक प्रेमकथा असलेल्या भारतभरातील जोडप्यांकडून तब्बल दीड लाखांहून अधिक मते मिळाली. त्यामुळे अद्वितीय कथाकथनाद्वारे वैशिष्ट्यपूर्ण रोमांससह शेकडो प्रतिस्पर्ध्यांवर मात करत भारतातली ७७ जोडपी यंदाचे विजेते ठरले.

विजेत्यांना व्हिएतनामची प्रसिद्ध सांस्कृतिक, आर्थिक व पर्यटन केंद्रे, हनोई, दा नांग, हो ची मिन्ह सिटी, फू क्वॉक येथील विमानाची तिकिटे व रोमँटिक हनीमून टूरची बक्षिसे मिळाली. यासाठी प्रवासाचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२३ ते ३० जून २०२३पर्यंतचा असणार आहे. विजेत्यांची घोषणा मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आली. तसेच विजेत्यांची यादी लव्हकनेक्शन.व्हिएतजेटएअर, या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. विशेषतः या जोडप्यांना व्हिएतजेटच्या भागीदारांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या जगातली अग्रगण्य निवाससेवा विन पर्ल, आना मंदारा, रॉयल हा लॉन्ग, फुरामा यांचादेखील अनुभव घेता येणार आहे.

विजेत्या जोडप्यांचे प्रतिनिधीत्व करत एक जोडपे मनुभा – आशा म्हणाले की, ‘‘व्हिएतजेटकडून मिळालेली ही भेट अर्थपूर्ण आहे. ती बालपणीच्या मैत्रीतून जपलेल्या प्रेमकथेच्या आठवणींनी भरलेली आहे. आशा आहे की, व्हिएतजेट नजीकच्या भविष्यात, विशेषतः तरुणांसाठी चांगली उड्डाणसेवा आणण्यासाठी भारतीय व्यक्तींशी कायम संलग्न राहिल.’’

व्हिएतजेटचे उपाध्यक्ष डो जुआन क्वांग यांनी विजेत्या जोडप्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाले की, ‘‘लव्ह कनेक्शन हा, व्हिएतजेटने भारतीयांना व्हिएतजेटसह उड्डाण करण्याची संधी देण्यासाठी डिझाइन केलेला विशेष उपक्रम आहे. हा उपक्रम वेळोवेळी भारतीय प्रवाशांचे प्रेम आणि पाठिंबा देता. त्याबद्दल एअरलाइन कृतज्ञ आहे. आम्हाला आशा आहे की, व्हिएतजेट अधिकाधिक भारतीय पर्यटकांना त्यांच्या व्हिएतनाम आगमनासाठी, विशेषत: जोडप्यांना त्यांच्या सुट्टीत व्हिएतनामचे सौंदर्य पाहण्यासाठी सेवा देऊ शकेल आणि विविध क्षेत्रात व्हिएतनाम व भारत यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल.’’

व्हिएतजेट सध्या व्हिएतनाम व भारतादरम्यान हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि दा नांग यांना नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, या भारतातील मोठ्या शहरांशी जोडणारी थेट उड्डाणे असलेली विमानसेवा आहे.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content