Homeचिट चॅटऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना...

ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अपारंपरिक विषयात रस

भारतीय विद्यार्थी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या मुख्य प्रवाहाच्या पलिकडील विषय शिकण्यास पसंती देत आहेत. प्रादेशिक आणि परदेशी भाषा शिकण्यात तसेच मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्रसारखे विषय शिकण्यामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढल्याचे ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मने ई-लर्निंगच्या प्रवाहांचे परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

१,९६३ विद्यार्थी सामील असलेल्या सर्वेक्षणातील ४२% विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना गणित, विज्ञान आणि इंग्रजीसह त्यांना हव्या असलेल्या विषयांसाठी चांगले स्रोत उपलब्ध आहेत. उलटपक्षी, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना (५८%) वाटते की, त्यांच्या आवडीच्या अपारंपरिक विषयांत मदतीसाठी योग्य स्रोत उपलब्ध नाहीत. यात संस्कृत (१२%), मानसशास्त्र (१०%), राज्यशास्त्र (९%), तत्त्वज्ञान (६%) आणि इतर (२०%) आदींचा समावेश आहे.

या परिणामांद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि सर्वसमावेशक ऑनलाईन स्रोतांची उपलब्धता यातील फरक अधोरेखित झाला. नवोदित एडटेक कंपन्यांनी ही कमकुवत बाजू ओळखली पाहिजे. तसेच गणित, विज्ञान आणि इंग्रजी या पारंपरिक त्रिकुटापलिकडे ऑनलाईन शैक्षणिक स्रोत वाढवून या गटातील ग्राहकांच्या गरजा पुरवल्या पाहिजेत.

या सर्वेक्षणात, भारतीय विद्यार्थ्यांनी घरी राहून शिकताना कोणत्या विषयाचा सर्वाधिक आनंद घेतला, हे शोधण्यात आले. तेव्हा गणित, विज्ञान आणि भाषा (इंग्रजी किंवा इतर) या विषयांना समान २३% मते दिली गेली. त्यानंतर समाजशास्त्र आणि कॉम्प्यूटर/तंत्रज्ञान इत्यादींचा क्रमांक लागतो. त्यांनाही दूरस्थ शिकणाऱ्यांनी प्रत्येकी ११% मते दिली आहेत. घरी राहून शिकताना बहुतांश रिमोट लर्नर्सनी (३३%) गणितासाठी सर्वाधिक मदत लागल्याचे सांगितले. त्यानंतर विज्ञान (२३%), इंग्रजी (१७%), सोशल सायन्स (१३%) आणि कॉम्प्यूटर/ तंत्रज्ञान (९%) यांचा क्रमांक लागतो.

कठीण विषयाचा अभ्यास करताना कोणत्या स्रोताची सर्वाधिक मदत झाली हे विचारले असता, एक तृतीयांश (३३%) सहभागींनी अभ्यासात मदत करणाऱ्यांमध्ये ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला पसंती दिली. उर्वरीत विद्यार्थ्यांनी (३२%) पुस्तके आणि सर्च इंजिन्स (३०%) या पर्यायांकडून अभ्यास करताना पूरक मदत घेतल्याचे सांगितले. तर दुसरीकडे, सर्वेक्षणात दिसून आले की, ५% विद्यार्थ्यांनी शिकतानाच होम ट्युशन्स, कोचिंग क्लासेस किंवा सेल्फ स्टडी आदींची मदत घेतली.

या निरीक्षणांद्वारे, भारतातील के-१२ क्षेत्र कोणत्या महत्त्वपूर्ण बदलांना सामोरे जावे लागत आहे, हे अधोरेखित करते. अधिक गतिशील, समाज-आधारीत उपाय, जे विद्यार्थ्यांना कधीही, कुठेही उपलब्ध होतात या पर्यायांमुळे शिक्षणाच्या पारंपरिक पद्धतींना कालबाह्य ठरवले जात आहे.

ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी म्हणतात की, आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे शाळेपुरतेच मर्यादित नाही. महामारीने विद्यार्थ्यांना वर्गात येण्यापासून रोखलेले असले तरीही भारतातील तरुण वर्ग आशावाद आणि कुतूहल आधारीत निर्धाराने त्यांच्या शिक्षण प्रवासात ऑनलाईन स्रोतांवर अवलंबून राहत आहेत. ऑनलाईन लर्निंग साधने विद्यार्थ्यांना मदत करत आहेत, हे सर्वेक्षणातून दिसलेच, मात्र गणित, विज्ञान आणि इंग्रजी या पारंपरिक त्रिकुटापलिकडील विषयांसाठी विश्वसनीय ऑनलाईन सामग्रीची उपलब्धता कमी असल्याचे दिसून आले. तरुण विद्यार्थ्यांना मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, पुरातत्त्व तसेच समकालीन प्रादेशिक भाषा उदा. संस्कृत आणि मराठी आदी विषय शिकण्याचीही उत्सुकता आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content