भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक मुख्य घटक असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्सची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची घोषणा इंडियन पॅनोरमाने केली आहे. गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या काळात होत असलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) हे निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीनं (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) इंडियन पॅनोरमाचं आयोजन केलं जातं. इंडियन पॅनोरमाअंतर्गत आखलेल्या नियमांमध्ये नमूद अटी आणि कार्यपद्धतीनुसार सिनेमॅटिक, थिमॅटिक आणि सौंदर्यशास्त्रीय पातळीवर उत्कृष्ट असतील अशा फिचर नॉन फिचर फिल्म्सची निवड करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे.
‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड संपूर्ण भारतातील सिनेजगतातील नामवंत व्यक्तींच्या मार्फत केली जाते. यात फिचर फिल्म्ससाठी एकूण बारा सदस्य तर नॉन-फिचर फिल्म्ससाठी सहा सदस्य ज्युरी म्हणून काम पाहतात. हे सर्व ज्युरी, सदस्य आणि संबंधित अध्यक्षांच्या नेतृत्त्वातील निवड समिती चित्रपटांची निवड करतात. आपल्या वैयक्तिक ज्ञान कौशल्याचा वापर करून, ही नामवंत व्यक्तिमत्वांची निवड समिती एकसमान योगदान देत, एकमतानं चित्रपटांची निवड करते. त्यातूनच इंडिअन पॅनोरमा अंतर्गतच्या विविध वर्गवारीत सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली जाते.
फिचर फिल्म्स
बारा सदस्यांचा समावेश असलेल्या यंदाच्या या फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्त्व, निवड समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता डॉ. टी. एस. नागभरणा यांनी केलं. या बारा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत.
- ए. कार्तिक राजा; सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार
- अंजन बोस; चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता
- डॉ.इतराणी सामंता; चित्रपट निर्माता आणि पत्रकार
- के पी व्यासन; चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
- कमलेश मिश्रा; चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
- किरण गंटी; चित्रपट संपादक आणि दिग्दर्शक
- मिलिंद लेले; चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता
- प्रदिप कुरबा; चित्रपट दिग्दर्शक
- रमा विज; अभिनेत्री
- रोमी मीतेई; चित्रपट दिग्दर्शक
- संजय जाधव; चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर / छायाचित्रणकार
- विजय पांडे; चित्रपट दिग्दर्शक आणि संपादक
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातल्या फिचर फिल्मच्या वर्गवारीकरता एकूण 408 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून वैशिष्ट्यपूर्ण 25 चित्रपटांचे पॅकेज निवडण्यात आले आहे. निवडलेले हे 25 चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या बहुरंगी आणि विविधतेचे दर्शन घडवणारे चित्रपट आहेत.
इंडियन पॅनोरमा 2023 अंतर्गत फिचर फिल्मस वर्गवारीसाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे:
S. No. | Title of Film | Language | Director’s Name |
1 | Aaraariraaro | Kannada | Sandeep Kumar V |
2 | Aattam | Malayalam | Anand Ekarshi |
3 | Ardhangini | Bengali | Kaushik Ganguly |
4 | Deep Fridge | Bengali | Arjun Dutta |
5 | Dhai Aakhar | Hindi | Praveen Arora |
6 | Iratta | Malayalam | Rohit M.G. Krishnan |
7 | Kaadhal Enbathu Pothu Udamai | Tamil | Jayaprakash Radhakrishnan |
8 | Kaathal | Malayalam | Jeo Baby |
9 | Kantara | Kannada | Rishab Shetty |
10 | Malikappuram | Malayalam | Vishnu Sasi Shankar |
11 | Mandali | Hindi | Rakesh Chaturvedi Om |
12 | Mirbeen | Karbi | Mridul Gupta |
13 | Neela Nira Sooriyan | Tamil | Samyuktha Vijayan |
14 | Nna Thaan Case Kodu | Malayalam, | Ratheesh Balakrishna Poduval |
15 | Pookkaalam | Malayalam | G A N E S H R A J |
16 | Rabindra Kabya Rahasya | Bengali | Sayantan Ghosal |
17 | Sanaa | Hindi | Sudhanshu Saria |
18 | The Vaccine War | Hindi | Vivek Ranjan Agnihotri |
19 | Vadh | Hindi | Jaspal Singh Sandhu |
20 | Viduthalai Part 1 | Tamil | Vetri Maaran |
Mainstream Cinema Section | |||
21 | 2018-Everyone Is A Hero | Malayalam | Jude Anthany Joseph |
22 | Gulmohar | Hindi | Rahul V Chittella |
23 | Ponniyin Selvan Part – 2 | Tamil | Mani Ratnam |
24 | Sirf Ek Bandaa Kaafi Hai | Hindi | Apoorv Singh Karki |
25 | The Kerala Story | Hindi | Sudipto Sen |
इंडियन पॅनोरमा 2023 च्या फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवडसमितीनं आनंद एकार्शी दिग्दर्शित ‘अट्टम’ या मल्याळम चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.
नॉन फिचर फिल्म्स
यंदाच्या सहा सदस्यांचा समावेश असलेल्या नॉन फीचर फिल्म ज्युरींचं नेतृत्व, या निवडसमीतीचे अध्यक्ष प्रख्यात माहितीपट दिग्दर्शक अरविंद सिन्हा यांनी केलं. या सहा सदस्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये, तसंच चित्रपटांशी संबंधित व्यवसायांमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीमत्वांचा समावेश होता. महत्वाचं म्हणजे हे सगळे ज्युरी सदस्य आपल्या व्यवसायातल्या बहुविविधतेचं प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीमत्वं आहेत :
- अरविंद पांडे; चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक
- बॉबी वाहेंगबम; चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता
- दिप भुयान, चित्रपट दिग्दर्शक
- कमलेश उदासी; चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता
- पौशाली गांगुली; अॅनिमेटर, चित्रपट दिग्दर्शिका आणि पटकथा लेखिका
- वरुण कुर्तकोटी; चित्रपट दिग्दर्शक
54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागातअंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या समकालीन नॉन फिचर फिल्म या वर्गवारीकरता एकूण 239 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून 20 चित्रपटांची निवड करण्यात आली. निवडलेल्या या 20 चित्रपटांमधून भारतातील उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या एखादा विषयाचे ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करणे, त्या त्या विषयांसाठी संशोधन करणे आणि त्याचवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासंबंधीच्या क्षमतेचे दर्शन घडते आणि ते समकालीन भारतीय मूल्ये देखील प्रतिबिंबित करतात.
इंडियन पॅनोरमा 2023 अंतर्गत नॉन फिचर फिल्म्स वर्गवारीत निवड झालेल्या 20 चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे:
S. No. | Film Name | Language | Director |
1 | 1947: Brexit India | English | Sanjivan Lal |
2 | Andro Dreams | Manipuri | Longjam Meena Devi |
3 | Baasan | Hindi | Jitank Singh Gurjar |
4 | Back To The Future | English | M.S. Bisht |
5 | Baruar Xongxar | Assamese | Utpal Borpujari |
6 | Behrupiya – The Impersonator | Hindi | Bhasker Vishwanathan |
7 | Bhangaar | Marathi | Sumira Roy |
8 | Nansei Nilam (Changing Landscape) | Tamil | Pravin Selvam |
9 | Chupi Roh | Dogri | Disha Bhardwaj |
10 | Giddh (The Scavenger) | Hindi | Manish Saini |
11 | Kathabor | Assamese | Keshar Jyoti Das |
12 | Lachit (The Warrior) | Assamese | Parthasarathi Mahanta |
13 | Last Meet | Manipuri | Waribam Dorendra Singh |
14 | Life In Loom | Hindi, Tamil,Assamese, Bengali, English | Edmond Ranson |
15 | Mau: The Spirit Dreams Of Cheraw | Mizo | Shilpika Bordoloi |
16 | Pradakshina | Marathi | Prathamesh Mahale |
17 | Sadabahar | Konkani | Suyash Kamat |
18 | Sri Rudram | Malayalam | Ananda Jyothi |
19 | The Sea & Seven Villages | Oriya | Himansu Sekhar Khatua |
20 | Utsavmurti | Marathi | Abhijeet Arvind Dalvi |
इंडियन पॅनोरमा 2023 च्या नॉन फिचर फिल्म्स या वर्गवारीचा उद्घाटनीय चित्रपट म्हणून निवडसमितीनं कुमारी लाँगजाम मीना देवी दिग्दर्शित ‘एंड्रो ड्रीम्स’ या मणिपुरी चित्रपटाची एकमतानं निवड केली आहे.
भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशासह भारतीय चित्रपटांना चालना देण्याच्या उद्देशानं, 1978 भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गतच (इफ्फी) इंडियन पॅनोरमा हा विभाग सुरू करण्यात आला होता. त्या त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट दाखवण्यासाठी इंडियन पॅनोरमा वचनबद्ध आहे, आणि इंडियन पॅनोरमाच्या स्थापनेपासून हे काम अव्याहतपणे सुरू आहे. इंडियन पॅनोरमा विभागासाठी चित्रपट निवडीमागे चित्रपट कलेच्या प्रसाराचा मुख्य उद्देश आहे, त्यामुळेच या विभागा अंतर्गत निवडलेले चित्रपट, भारत आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, द्विपक्षीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांच्यावेळी आयोजित भारतीय चित्रपट सप्ताहात, तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या अधिकृत चौकटीपलिकडे आयोजित होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सव आणि भारतातील विशेष भारतीय पॅनोरमा महोत्सवांमध्ये ना-नफा तत्त्वावर दाखवले जातात.