Homeबॅक पेजशुक्रवारपासून नागपूरमध्ये भारतीय...

शुक्रवारपासून नागपूरमध्ये भारतीय लष्कराची ‘शौर्य संध्या’!

भारतीय लष्कराच्या नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात-उमंग सबएरियातर्फे नागपूरमधील मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे येत्या 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान ‘शौर्य संध्या’ या भारतीय लष्कराच्या संदर्भात असणाऱ्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना भारतीय लष्कराच्या शौर्य कार्यवाही, शस्त्रास्त्र प्रदर्शन, भारतीय लष्कराच्या विविध तुकड्यांतर्फे केले जाणाऱ्या प्रात्यक्षिकांची प्रदर्शन बघायला मिळणार आहेत, अशी माहिती उमंग सब एरीयाचे जनरल ऑफिसर इन कमांड मेजर जनरल एस. के. विद्यार्थी यांनी काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी गार्ड रेजिमेंटल सेंटरचे ब्रिगेडीअर के. आनंद, रक्षा जनसंपर्क अधिकारी रत्नाकर सिंग उपस्थित होते.

यामध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यात असलेले विविध प्रकारचे रणगाडे, हेलिकॉप्टर, शस्त्रास्त्रे अभियांत्रिकी उपकरणे त्याचप्रमाणे विविध लष्करी संग्रहालयाचे प्रदर्शन दालने असणार आहेत. उद्घाटन समारंभ 2 फेब्रुवारीला संध्याकाळी 4.30 ते 6 या वेळेत होणार असून या दरम्यान प्रेक्षकांना विविध प्रकारच्या लष्कराच्या कार्यवाही यामध्ये मोटरसायकल डिस्प्ले, आर्मी डॉग शो, विशेष पथकांच्या कार्यवाही, आर्मी सिंफनी बॅंड, ड्रोन डिस्प्ले, फ्लाय पास्ट यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

3 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून हे प्रदर्शन सामान्य जनतेकरीता खुले राहणार आहे. तरी या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी आणि लष्कराकडे भविष्यातील एक परिपूर्ण करिअर संधी आणि देशसेवेची एक अभुतपूर्व संधी म्हणून पहावे असे आवाहन मेजर जनरल एस के विद्यार्थी यांनी केले आहे.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content