उत्तरलाई येथील हवाई तळावर 30 ऑक्टोबर 23 रोजी आयोजित एका समारंभाद्वारे भारतीय हवाई दलात नवीन विमानांचा औपचारिक समावेश करण्यात आला. या समारंभात मिग-21 आणि सुखोई-30 एमकेआय या विमानांनी एकत्रित हवाई कसरती केल्या. या माध्यमातून मिग-21 विमानांच्या स्क्वाड्रनने शेवटचे उड्डाण केले. या समारंभाला विविध लष्करी आणि नागरी मान्यवरांची उपस्थिती होती. भारतीय हवाई दल आता मिग-21 विमानांच्या केवळ दोन स्क्वाड्रनचे परिचालन करेल, हे या स्क्वाड्रनचे सुखोई-30 एमकेआय मध्ये रूपांतर सूचित करते. भारतीय हवाई दल 2025 पर्यंत मिग-21 विमानांचा वापर टप्प्याटप्प्याने थांबवण्यासाठी वचनबद्ध आहे.
भारतीय हवाई दलाची उत्तरलाई (बाडमेर) हवाई तळावर स्थित क्रमांक 4 ची स्क्वाड्रन (ऊरिअल्स) मिग-21 मधून सुखोई-30 एमकेआयमध्ये रूपांतरित करण्यात आली असून 1966 पासून मिग-21 चे परिचालन करणाऱ्या स्क्वाड्रनचा इतिहासातील निर्णायक क्षण आहे. मिग-21 हे भारतीय हवाई दलाच्या सेवेतील पहिले स्वनातीत (सुपरसॉनिक) लढाऊ विमान आहे आणि 1963 मध्ये हवाई दलात या विमानाचा समावेश झाला होता, तेव्हापासून सर्व मोठ्या युद्धांमध्ये या विमानाचा सहभाग होता. हा बदल भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि त्याचवेळी देशाच्या अवकाशाचे रक्षण करण्यासाठी अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे.