Homeटॉप स्टोरीअंतराळाच्या दुनियेत आज...

अंतराळाच्या दुनियेत आज संध्याकाळी भारत रचणार इतिहास!

आज संध्याकाळी इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. भारताकडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवण्यात आलेले चांद्रयान-३चे लॅन्डर विक्रम संध्याकाळी ६ वाजून चार मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. हे लँडिंग यशस्वी झाल्यावर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा जगातला पहिला देश ठरेल. या लँडिंगच्या दोन तास आधी इस्त्रोकडून तेथील वातावरणाची चाचपणी केली जाईल. हे वातावरण अनुकूल नसल्यास लँडर उतरवले जाणार नाही. २७ तारखेपर्यंत योग्य वातावरण पाहून ते उतरवले जाईल. तितके इंधन यानात असल्याने ते चंद्राभोवती फिरत राहील, असे सांगण्यात आले आहे. लँडिंगचा हा थरार आज संध्याकाळी थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात येणार असून संपूर्ण जगाचे डोळे त्याकडे लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीही आभासी पद्धतीने यावेळी हा सुवर्णक्षण अनुभवण्यासाठी उपस्थित असतील.

लँडिंगचा हा थरार संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता.

ISRO Website https://isro.gov.in

YouTube https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss

Facebook https://facebook.com/ISRO

DD National TV

भारत

संध्याकाळी पावणेसहा वाजल्यापासून १८ मिनिटांचा हा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या १८ मिनिटांतले काही अत्यंत कठीण टप्पे जे आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत त्यात रफ ब्रेकिंग फेज, Atitude Holding फेज, Fine ब्रेकिंग फेज आणि टर्मिनल डिसेंट फेज या टप्प्यांचा समावेश आहे. हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार पडल्यानंतर लँडरमधून प्रज्ञान नावाचा रोव्हर बाहेर पडेल जो तब्बल १४ दिवस चंद्रावरील पाणी, बर्फ, वायू, भूकंपाच्या धक्क्यांची माहिती गोळा करेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंद्राच्या या भागावर काही अब्ज वर्षांपासून सूर्याचा प्रकाश पडलेला नाही. अशा या अंधकारमय पृष्ठभागावर भारत आपले यान उतरवणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यावर लँडर विक्रम तसेच रोव्हर प्रज्ञान एकमेकांचे पोटो काढतील आणि सारा भारत जल्लोष करेल…

इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव डॉ. एस सोमनाथ यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणूऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची नुकतीच नवी दिल्ली इथे भेट घेतली आणि त्यांना चांद्रयान 3 च्या चंद्रावर उतरण्यासंदर्भातली सद्यस्थिती आणि सज्जता याविषयी माहिती दिली.

इस्रोच्या अध्यक्षांनी डॉ सिंह यांना चांद्रयान-3 च्या सद्यस्थिती बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की सर्व प्रणाली योग्य रीतीने काम करत असून बुधवारी यान उतरताना काही समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. चांद्रयानावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. चंद्रावर उतरण्यासंदर्भातला सर्व कार्यक्रम दोन दिवस आधीच लोड केला गेला आहे. डॉ. सिंह यांनी विश्वास व्यक्त केला की यावेळी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली अंतराळ मोहिमांचा एक नवा इतिहास घडवला जाईल, अशी आशाही व्यक्त केली.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयन 3 चंद्रावर 23 ऑगस्ट 2923 रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:04 वाजता उतरण्यास सज्ज आहे. चांद्रयान 2 मोहीम पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही कारण हार्ड लँडिंगमुळे यानाशी असलेला संपर्क तुटला होता. यावेळी चांद्रयान 3 लँडर मोड्यूल आणि अजूनही कक्षेत भ्रमण करत असलेल्या चांद्रयान 2 ऑर्बिटर यांच्यात दुहेरी संपर्क राखण्यात इस्रो यशस्वी झाली आहे. आज चांद्रयान 3 ने टिपलेली चंद्राच्या दूरवरच्या भागातील छायाचित्रे प्रसिद्ध केली.

अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर आपले यान पाठवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल, मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश असेल.

चांद्रयान तीन ची मुख्य तीन उद्दिष्टे आहेत – 1) चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लॅंडींग म्हणजे अलगद उतरणे 2) चंद्रावर रोव्हर रोविंग  आणि 3) तिथे स्थापित होऊन वैज्ञानिक प्रयोग करणे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी चांद्रयान मालिकेतील पहिले यान म्हणजेच चांद्रयान एकचे स्मरण केले. या यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा शोध लावला होता, जी संपूर्ण जगासाठी एक नवी माहिती होती आणि जगातील सर्वात प्रमुख म्हणवली जाणारी अमेरिकेची अवकाश संस्था नासासुद्धा या शोधामुळे आश्चर्यचकित झाली होती तसेच, या माहितीचा त्यांनी त्यांच्या पुढच्या प्रयोगांमधे उपयोग केला होता, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.

चांद्रयान-3 अभियान 14 जुलै 2030 सुरू करण्यात आले. या दिवशी जीएसएलव्ही मार्क 3 (एल व्ही एम 3) ह्या जड अवकाश यानांचे वहन करू शकणाऱ्या प्रक्षेपक यानावरुन आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोट्टा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले होते.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content