Homeचिट चॅटभारतात या वर्षाअखेर,...

भारतात या वर्षाअखेर, 35 भूकंप निरीक्षण केंद्रे!

देशात या वर्षाच्या अखेरीस आणखी 35 भूकंप निरीक्षण केंद्रे उभारली जातील तसेच येत्या पाच वर्षांत, अशी आणखी 100 केंद्रे देशभरात निर्माण होतील, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल दिली.

स्वातंत्र्यानंतर म्हणजे गेल्या 65 वर्षांत, देशभरात केवळ 115 भूकंप निरीक्षण केंद्रे स्थापन होऊ शकली. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत, देशात भूकंप निरीक्षण केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय भू-मॅग्नेशियम आणि अवकाश शास्त्र- आयएजीए तसेच, आंतरराष्ट्रीय भूकंपशास्त्र आणि पृथ्वीच्या गर्भातील भौतिकशास्त्र संस्था- आयएएसपीईआयने आयोजित केलेल्या संयुक्त विज्ञान परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. भारतीय उपखंड, भूकंप, भूस्खलन, चक्रीवादळे, पूर, त्सुनामी अशा नैसर्गिक संकटासाठी प्रवण भाग मानला जातो. त्यामुळे अशा संकटांचा सामना करण्यासाठी मोदी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले.

आयएजीए आणि आयएएसपीईआय च्या या संयुक्त विज्ञान सभेतून, या विषयावर संशोधन करणारे अधिकाधिक जागतिक संशोधक निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भूगर्भात खोलवरच्या रचना आणि भू-मैग्नेशियम यातील परस्परसंबंध तसेच भूकंपकेंद्रात द्रवपदार्थाचा उपयोग, अशा विषयांवर, आंतरशाखीय अध्ययन केले जाऊ शकते. आयएजीए आणि आयएएसपीईआय यांनी 2021पासूनच ही संयुक्त परिषद सुरू केली आहे. भारत सरकारच्या पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या पाठिंब्याने सीएसआयआर-एनजीआरआयने यंदा ही परिषद आयोजित केली आहे. या संयुक्त परिषदेत होणाऱ्या विविध मालिका सत्रात, पृथ्वी विज्ञान व्यवस्थेचे शास्त्र जाणून घेण्यासाठी नवनवे पैलू समोर येतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content