Homeचिट चॅटभारत जगातील सर्वात...

भारत जगातील सर्वात मोठा ‘कनेक्टेड’ देश!

भारत आज 800 दशलक्षाहून अधिक ब्रॉडबँड वापरकर्त्यांसह जगातील सर्वात मोठा ‘कनेक्टेड’ देश बनला आहे, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.

ते ‘इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2022’च्या समारोप समारंभामध्ये बोलत होते. ‘लेव्हरेजिंग टेकेड फॉर एम्पॉवरिंग भारत’ ही या परिषदेची संकल्पना होती. यावेळी मेटी(MeitY) सचिव अल्केश कुमार शर्मा आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजीव चंद्रशेखर म्हणाले की, 800 दशलक्ष भारतीय ग्राहक असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा ‘कनेक्टेड’ देश आहे. फाईव्ह जी (5G) आणि भारतनेट या सर्वात मोठ्या ग्रामीण ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी नेटवर्क असलेल्या प्रकल्पाचे 1.2 अब्ज भारतीय ग्राहक असतील, जी जागतिक इंटरनेट उद्योगातील एकमात्र सर्वात मोठी संख्या असेल. आम्हाला भविष्यात तांत्रिक नवोन्मेष तसेच अद्ययावत नियामक धोरणे सुसंगत करण्याची आकांक्षा आहे. सर्व भागधारकांचा सखोल सहभाग हा या जागतिक संगणकीय गुन्हेगारीविरोधी कायद्याच्या मानांकनाचा आराखडा (ग्लोबल स्टँडर्ड सायबर लॉ फ्रेमवर्क) याचा तिसरा टप्पा असेल जो भारतीय इंटरनेट आणि अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण करेल अशी आम्हाला आशा वाटते.

इंडिया इंटरनेट गव्हर्नमेंट फोरम हा युनायटेड नेशन्स इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (UN-IGF) याच्याशी संबंधित असलेला उपक्रम आहे. इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (IGF) हे एक बहुविध उद्यमशील लोकांचे व्यासपीठ आहे (मल्टी-स्टेकहोल्डर प्लॅटफॉर्म). ते इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरण समस्यांवर चर्चा करण्यासाठी विविध गटांतील प्रतिनिधींना एकत्र आणते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content