Homeएनसर्कलदेशांतर्गत विमान प्रवासी...

देशांतर्गत विमान प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ!

देशांतर्गत विमान कंपन्यांमार्फत प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याने देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात प्रभावी वाढ झाली आहे. विविध देशांतर्गत विमान कंपन्यांनी प्रदान केलेल्या प्रवासी वाहतूक माहितीच्या आधारे, जानेवारी – मे 2023 दरम्यान प्रवासी संख्येने 636.07 लाख इतका प्रभावी टप्पा गाठला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 36.10% लक्षणीय वार्षिक वृद्धी दर दर्शवितो. जानेवारी – मे 2022 या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांमार्फत प्रवास करणाऱ्यांची संख्या 467.37 लाख होती.मे 2022 मध्ये देशांतर्गत विमान प्रवासी संख्या 114.67 लाख होती, जी मे 2023 मध्ये वाढून 132.41 लाख झाली असून प्रवासी संख्येने 15.24% ची मासिक वाढ नोंदवली आहे. प्रवासी संख्येतील ही सातत्यपूर्ण वाढ सुरक्षित, कार्यक्षम आणि ग्राहक-केंद्रित विमान वाहतूक परिसंस्थेला चालना देण्यासाठी विमान कंपन्या, विमानतळे आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे.

एप्रिल 2023 च्या तुलनेत मे 2023 मध्ये एकूण प्रवासी संख्येत 3.26 लाख (2.52%) वाढ झाली आहे. प्रवाशांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राची ताकद आणि टिकाऊपणा दर्शवते. यासोबतच संपर्क सुविधा सुधारण्यासाठी तसेच देशातील नागरिकांना सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकार करत असलेल्या निरंतर प्रयत्नांची ही परिणीती आहे. जानेवारी – मे 2023 दरम्यान 636.07 लाख प्रवाशांचा उच्च भार घटक हवाई वाहतुकीची वाढती मागणी सूचित करतो, तसेच यातून विमान वाहतूक उद्योगाची अनुकूल दिशा अधोरेखित होते. मे 2019 च्या तुलनेत मे 2023 मध्ये तक्रारींची संख्या देखील कमी झाली आहे. मे 2019 मध्ये, देशांतर्गत विमान कंपन्यांबाबत एकूण 746 प्रवाशांशी संबंधित तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर मे 2023 मध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांबाबत एकूण 556 प्रवाशांशी संबंधित तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारताला एक प्रमुख जागतिक हवाई वाहतूक केंद्र म्हणून स्थापित करण्यात सर्व हितधारकांच्या सहयोगी प्रयत्नांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे मत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केले. देशांतर्गत विमानसेवा उद्योगाचा सतत होणारा विस्तार आणि प्रादेशिक विमान कंपन्यांची स्थापना या बाबी आपली अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत, सोबतच देशभरातील लोकांना एकमेकांशी जोडत आहे आणि उडान योजनेद्वारे शेवटच्या टप्प्यापर्यंतची संपर्क सुविधा सुनिश्चित करत आहे, असे ते म्हणाले. सुरक्षा, मजबूत कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या समाधानाची सर्वोच्च मानके सुनिश्चित करत विमान वाहतूक उद्योगाची भरभराट होण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठीही मंत्रालय वचनबद्ध आहे.” असेही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले.
काळजीपूर्वक आणि कसून नियोजन, कार्यात्मक परिणामकारकता आणि हवाई वाहतूक उद्योगाने केलेल्या सक्रिय कृतींचा परिणाम म्हणून हे यश प्राप्त झाले आहे.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content