Thursday, November 7, 2024
Homeकल्चर +20 नोव्हेंबरपासून गोव्यात...

20 नोव्हेंबरपासून गोव्यात इफ्फीचे आयोजन!

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 52वा महोत्सव येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या काळात गोव्यात होणार आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या महोत्सवाचे नियम व पोस्टर जारी केले.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. जानेवारी 2021मधील 51व्या आवृत्तीचे यश लक्षात घेता इफ्फीची 52वी आवृत्ती संमिश्र स्वरुपात आयोजित केली जाईल. गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) या महोत्सवाचे आयोजन करीत आहे.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर असोसिएशनद्वारे (एफआयएपीएफ) इफ्फीला मान्यता आहे. दरवर्षी या महोत्सवात चित्रपट सृष्टीतील दर्जेदार कलाकृतींची निवड होते आणि भारत आणि जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातात. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 52व्या आवृत्तीच्या स्पर्धात्मक विभागात सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्ट 2021पर्यंत नोंदणी करता येईल.

भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यावेळी इफ्फीमध्ये भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय विशेष कार्य आढाव्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करेल. तसेच, त्यांच्या कारकिर्दीचा वारसा जपत, “चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार” या वर्षापासून प्रत्येक वर्षी इफ्फीमध्ये देण्यात येणार आहे.

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content