Homeमुंबई स्पेशलऐतिहासिक बाणगंगा तलावाचा...

ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा होणार कायापालट

मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धार प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते काल झाले. 

या भूमिपूजनप्रसंगी मुंबई महापालिकेचे डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बाणगंगा परिसराच्या स्वच्छतेसाठी आणलेल्या क्लिनिंग व्हॅनचेदेखील लोकार्पण यानिमित्ताने करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धारासाठी विविध कामे केली जाणार आहेत.

जीर्णोद्धार कामांमध्ये बाणगंगा तलावासभोवतालचा परिसर, रामकुंडालगतच्या परिसराची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्यांची तसेच संरक्षक भिंतींची आणि दीपस्तंभाची दुरुस्ती व जीर्णोद्धार, तलावाचे आतील बांधकाम काढणे, बटरफ्लाय झडप दुरुस्ती आणि सुधारणा अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. पालकमंत्री लोढा यांनी तलाव परिसरातील बांधकामे हटवून तलावाचा पुरातत्व वारसा जपण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेला निर्देश दिले होते. त्यानुसार या जीर्णोद्धार कामांचे नियोजन करण्यात आले आहे. 

वारसा स्थळांच्या यादीत ‘श्रेणी – १’मध्ये समाविष्ट असणाऱ्या या परिसराला जीर्णोद्धार कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन व आकर्षक रूप लाभणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली डी विभाग कार्यालयाच्या वतीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे यांच्या संनियंत्रणात ‘डी’ विभागातील विविध ऐतिहासिक ठिकाणांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. याच अंतर्गत बाणगंगा तलाव परिसर जीर्णोद्धाराचाही समावेश आहे. हा प्रकल्प “विशेष प्राधान्य प्रकल्प” म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील एक रस्ता ‘भक्ती मार्ग’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर साजेसे माहिती फलक, आकर्षक पथदिवे, वाराणसीतील विकास प्रकल्पाच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, विहार मार्ग (Promenade) इत्यादी बाबीदेखील या प्रकल्पांतर्गत साकारण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तलाव आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तलाव परिसरातील पुरातन वास्तुंचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त उघडे यांनी दिली. सदर कामे ही पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाच्या संचालनालय यांच्या मार्गदर्शनानुसार व मुंबई वारसा संवर्धन समिती यांच्याशी समन्वय साधून करण्यात येत आहेत. 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content