Homeएनसर्कलयेथे मिळते बाळाच्या...

येथे मिळते बाळाच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी ‘बाल आधार’ कार्ड!

नवजात, तान्ह्या बाळाच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी ‘बाल आधार’ कार्ड जारी करण्याची अभतपूर्व सुविधा महाराष्ट्रात कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने सुरू केली आहे. 12 डिसेंबर 2022पासून जारी केलेल्या या सेवेचा लाभ आतापर्यंत तब्बल 865 बाळांना झाला आहे. ही सेवा देणारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय महाराष्ट्रातील सर्वप्रथम आहे.

बाळाचा, बेबीचा जन्म झाल्या-झाल्या त्यांना अत्यंत महत्त्वाच्या तीन व्हॅक्सिन्स (टीका) देणे बंधनकारक आहे. आता त्यासह ‘बाल आधार’कार्डसाठी दररोज नोंदणी केली जाते. या ‘बाल आधार’कार्डची मुदत वयाच्या पाच वर्षांपर्यंतच आहे. त्यानंतर संबंधितांना नियमित आधारकार्ड मिळते.

‘आधार’ ही भारतातील सर्वात मोठी बायोमेट्रिक व्यक्तीपरिचय योजना आहे. योजनेचे नियंत्रण केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. आधार कायदा 2016 अनुसार या योजनेला वैधानिक पाठबळ प्राप्त आहे. बऱ्याच शासकीय, निमशासकीय अधिकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांकरीता आणि अन्य कामांसाठी, रेशन, बँका, शाळेत / महाविद्यालये, मोबाईल सेवांकरीता आधार संलग्न करण्यास आग्रह धरला जात आहे.

‘युआयडीएआय’च्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलच्या उपसंचालिका रुक्मिणी रामचंद्रन काही कामानिमित्त ठाणे येथे आल्या होत्या. त्यावेळी केंद्र सरकारचा ‘आधारकार्ड’ उपक्रम नवजात बाळांसाठी करता येईल का, याविषयी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर्स, ‘प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन’च्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा जाधव आदींची चर्चा झाली. चर्चेअंती ‘बाल आधार’कार्ड सुविधा सुरू करण्याचा निर्णय त्वरीत झाला. त्यामुळे ही सुविधा देणारे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय महाराष्ट्रात सर्वप्रथम ठरले आहे.

ही सुविधा सुरू होण्याकरीता कळवा-ठाणे येथील ‘राजीव गांधी मेडिकल कॉलेज’चे अधिष्ठाता आणि ठाणे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी (एमओएच) डॉ. योगेश शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. राजेश आढाव, ‘प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन’च्या सहाय्यक प्राध्यापक / प्रभारी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रज्ञा जाधव, बालरोग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक / प्रभारी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. जयेश पनोत आणि भावेश जाधव (समन्वयक) यांनी प्रयत्न केल्यामुळे या रुग्णालयाचे नाव वैद्यकीय क्षेत्रात कायमचे कोरले गेले आहे.

बाळाचा / बेबीचा जन्म झाल्यानंतरचा पहिला दिवस वगळता दुसऱ्या दिवशी आई किंवा वडिल यापैकी कोणीही एकजण ‘बाल आधार’कार्डसाठी बाळाची माहिती देऊन छ. शिवाजी महाराज रुग्णालयातील वॉर्ड क्र. चारमध्ये, पीएनसी वॉर्डात नोंदणी करतात. त्यासाठी वडिलांचे किंवा आईचे कार्ड आणि त्यांच्यापैकी एकाचा मोबाईल क्रमांक, अंगठ्याचा ठसा, ओळखपत्र व पत्ता असणे ‘आधार’भत आहे. ही प्रक्रिया अवघ्या चार मिनिटांची आहे, अशी माहिती डॉ. प्रज्ञा जाधव यांनी सांगितले. दररोज किमान 15 आधारकार्डांची तर कधीकधी हा आकडा 20 ते 24पर्यंत जातो, असेही त्या म्हणाल्या. रविवारी संबंधित विभागाला सुट्टी असली तरीही, रविवारची संख्याही सोमवारसह गणली जाते.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content