Homeकल्चर +हेलन केलर दिवस...

हेलन केलर दिवस उत्साहात साजरा!

हेलन केलर यांच्या जन्मदिनी दरवर्षी 27 जून रोजी हेलन केलर दिवस साजरा केला जातो. हेलन केलर जन्मतः कर्णबधिर आणि अंध होत्या, तरीही त्यांनी जीवनात जिद्द-चिकाटी ठेवली आणि आपले ध्येय साध्य केले. त्या प्रसिद्ध लेखिका बनल्या. अनेक पुस्तके प्रकाशित केली, “अमेरिकन फाउंडेशन फॉर द ब्लाइंड” ची स्थापनाही केली आणि दिव्यांग व्यक्तींची बाजू त्यांनी लावून धरली. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, अंध आणि कर्णबधिर आपले जीवन परिपूर्ण आणि सफल जगण्यास सक्षम आहेत. दिव्यांग व्यक्तींना पाठबळ देणे आणि त्यांना सामावून घेण्यात केलेल्या प्रगतीची दखल आपण हेलन केलर दिवसानिमित्ताने घेतो. प्रत्येकाकडे क्षमता असते आणि ते समाजासाठी खूप योगदान देऊ शकतात याची आठवण यामुळे जागी राहते.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग देशातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्व विकास कार्यक्रमांवर लक्ष ठेवणारी प्रमुख (नोडल) संस्था आहे. हेलन केलर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने आणि संबंधितांना विशेषत: दिव्यांगजनांना प्रेरित करण्यासाठी, विभागाने 27 जून 2023 रोजी हेलन केलर दिवस साजरा केला. सहयोगी संस्थांनी यानिमित्ताने देशभरात 50 हून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले.

हेलन केलर दिवस 27 जून 2023 रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने जनजागृती कार्यक्रम, परिसंवाद आणि कार्यशाळा, संस्थेच्या कम्युनिटी रेडिओ स्टेशन 91.2 NIVH हॅलो दूनद्वारे दृक् श्राव्य कार्यक्रम, वेबिनार, क्रीडा उपक्रम, प्रश्नमंजुषा स्पर्धा देशभरात आयोजित करण्यात आल्या होत्या.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content