Homeकल्चर +‘हिलिंग ईज ब्युटीफुल’:...

‘हिलिंग ईज ब्युटीफुल’: ‘जून’चा आविष्कार!

“हिलिंग ईज ब्युटीफुल. जर तुमच्या मनाचा एखादा कोपरा खचलेला असेल, एखादा असा भाग आहे जो बरा झाला पाहिजे तर ती प्रक्रिया सुरु होईल. मोकळे व्हा आणि संभाषण करा. आम्ही आमच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हेच दाखवू इच्छितो.” गोवा येथे आयोजित 51व्या भारतीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरामा विभागात प्रदर्शित केलेल्या जून, या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी हा संदेश दिला आहे.

काल, 20 जानेवारी 2021 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संभाषणांच्या आवश्यकतेविषयी बोलताना, दिग्दर्शक गोडबोले म्हणाले की, “दोन व्यक्तींमधील संपर्क असणे आवश्यक आहे. आमचा चित्रपट पुन्हा संभाषण करणाऱ्या लोकांबद्दल भाष्य करतो. बऱ्याचदा आपल्याला कोणाशी बोलायचे, आपल्या भावना कोणासोबत सामायिक करायचे हे माहित नसते. आजच्या या युगात प्रत्येक व्यक्ती हे एक बेट झाले आहे, आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात कोणाचीतरी आवश्यकता आहे. आजची पिढी आणि परीस्थीतीशी साधर्म्य दाखवणाऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.”

‘हिलिंग इज ब्युटीफुल’ या चित्रपटाच्या टॅगलाईनविषयी गोडबोले म्हणाले की, यामध्ये बरेच दृष्टीकोन आहेत. “आम्हाला मदत आणि उपचार शोधण्याची गरज आहे, बर्‍याचदा आपण स्वतःच्याच प्रेमात आणि विध्वंसात हरवून जातो. आपण आपल्यातील अपराधी भावना दूर करण्यास आणि आपल्या आतील राक्षसाचा अंत करून बरे होण्याची प्रक्रिया सुरू करण्यास कधीच घाबरू नये. यामुळे तुम्हाला बरे वाटेल. परंतु आपणास ही प्रक्रिया सुरू व्हावी लागेल.”

चित्रपटाचे दुसरे दिग्दर्शक वैभव खिस्ती म्हणाले की, ‘जून’मध्ये आम्ही अनेक विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्य अभिनेता सिद्धार्थ मेनन म्हणाले की, प्रत्येक सेकंद आनंद देणारा आहे आणि आव्हानात्मक भूमिका करायला मला आवडते.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content