Homeएनसर्कलपुण्याच्या जागेवरून महाविकास...

पुण्याच्या जागेवरून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा पुणे लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा दावा ठोकल्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. कालच या मतदारसंघावर आपला दावा सांगताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या भागात कोणाची ताकद किती आहे हे बघूनच महाविकास आघाडीने उमेदवारी निश्चित

महाविकास

करावी असे म्हटले होते. यासाठी महापालिका, नगरपालिका, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच विधानसभा सदस्यांच्या  संख्येचा विचार व्हावा आणि मगच महाविकास आघाडीने निर्णय करावा, असे ते म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी, पुण्याची पोटनिवडणूक असू दे किंवा पुढच्या वर्षी होणारी निवडणूक असू दे, पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार असल्याचे स्पष्ट केले. ही जागा काँग्रेसची होती, आहे आणि पुढेही राहणार असेही ते म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असे सांगत सगळ्यांनाच अप्रत्यक्षपणे सबुरीचा सल्ला दिला आहे. तुटेपर्यंत कोणीही ताणू नये, असे ते म्हणाले.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content