Homeकल्चर +जो स्वत:चा नाही,...

जो स्वत:चा नाही, तो तुमचा काय होणार, बिग बॉस?

बिग बॉसने सदस्यांवर “हल्लाबोल” हे कार्य सोपवले. घरातल्या सदस्यांच्या दोन टीम करण्यात आल्या. काल मोटर बाईकवर सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील बसल्या. सुरेखाताई ठामपणे आपला मुद्दा मांडताना दिसल्या. आम्ही इथे आलो आहोत तर आम्ही खेळताना दिसलोच पाहिजे, नुसतेच कॅप्टन बनण्याची इतकी हौस नाहीये.

बर्‍याच चर्चेनंतर सोनालीची सुरेखा ताईंसोबत टास्कला सुरुवात झाली. त्यानंतर मोटर बाईकवर बसायला आले विकास आणि विशाल. हा टास्क आजच्या भागातही बघायला मिळणार आहे. हे दोघे किती वेळ बाईकवर बसू शकतात हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. टास्क जिंकण्यासाठी टीममधले सदस्य अनेक फंडे वापरताना दिसणार आहेत. बघूया काय काय होते..

हल्लाबोल टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी विरुद्ध टीमचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात ना.. टास्क के लिये कुछ भी! टास्कच्या दरम्यान, आविष्कार विकास आणि विशालला धीर देताना दिसणार आहे, “मी रेडी आहे खेळायला, पण आता तुम्हाला खेळायचे आहे.

त्यावर स्नेहा आविष्कारला उद्देशून बोलताना दिसणार आहे “जो माणूस स्वत:चा नाही, तो तुमचा काय होणार”? आता स्नेहाच्या या टोमण्यावर आविष्कार काय उत्तर देणार? यावरून त्यांच्यामध्ये वाद होणार का? हे कळेलच आजच्या भागात.

बिग बॉसच्या घरात सुरू असलेल्या हल्लाबोल टास्कने बराच धुमाकूळ घातला आहे. शब्दांचा मारा थांबायचे काही नाव घेत नाहीये.. एकाचा टोमणा झाला की दुसरा लगेच बोलायला तयार आहे. या टास्कमध्ये जय, मीरा, गायत्रीदेखील काही थांबायचं नाव घेत नाहीये. एकामागून एक, काही ना काही.. शब्दफेक सुरूच आहे. एकही शब्द कोणी पडू देत नाहीये. विकास आणि विशाल मोटार बाईकवर बसल्यापासून सदस्यांची बडबड सुरू आहे.

याच टास्कमध्ये विकासने ऐकून घेतले आणि तो आज एक चॅलेंज देणार आहे. “गायत्री आणि मीरा एवढं बोलत आहेत. मी त्यांना Open Challenge देतो, जर तुमच्यामध्ये दम असेल तर उद्या पहिले तुम्ही येऊन दाखवा! आम्ही ज्याप्रकारे दोन मुली पाठवून खेळ सुरू केला तसं तुम्ही या, असं तो म्हणाला.

यानंतर शब्दाला शब्द वाढत जाणार आहे. मीराचं त्यावर उत्तर असणार आहे- “तू आमच्या मागे खेळलास” गायत्री आणि विकासचं बाँडिंग आपण बघितलच आहे. तीदेखील या टास्कमध्ये त्याला बोलताना दिसणार आहे. “तू तर बोलू नकोस, तू विशालच्या मिठीत खेळतो आहेस”, असं ती म्हणते.

विकास म्हणतो, “मला काहीच फरक पडत नाही.. हा वाद इथेच थांबला की पुढे अजून वाढला हे कळेलच आजच्या भागात.

बिग बॉसच्या घरात कधीकधी सदस्यांना कळत नाही की नक्की कसं वागावं, कोणावर विश्वास ठेवावा, कोण आपल्या बाजूने बोलतंय, किंवा कोणाच्या दबावामुळे एखादा सदस्य एकदम शांत होतो आणि ही गोष्ट घरातले इतर सदस्य पाहत असतात. अशावेळी ग्रुपमधले सदस्य, घरातील मित्र काही मोलाचा सल्ला देतात, ज्यामुळे पुन्हा एकदा उभारी येते. तसंच काहीसं आजही होणार आहे.

आज विशाल, सोनाली आणि मीनल याबद्दलच बोलताना दिसणार आहेत, ज्यामध्ये विशाल सोनालीला मोलाचा सल्ला देणार आहे. घरामध्ये असं कोणी तरी हवं ज्याच्याबरोबर तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करू शकता, जो तुम्हाला सल्लाही देऊ शकेल.

सोनाली तिच्या मनातली गोष्ट आज विशाल आणि मीनलला सांगताना दिसणार आहे. सोनाली विशालला सांगणार आहे, “टेंशन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये. मेंटल टॉर्चर करते.

विशाल सोनालीला सांगणार आहे. “तू कोणालाही बांधील नाहीयेस. तुला अक्कल आहे का? टास्कमध्ये तुझं काम होतं. तिकडच्या पोरांना खिळवून ठेवायला हवं होतंस. सगळेजण तिच्यावर भिडत होते. आम्हाला माहित आहे तुझी मेंटल परिस्थिती.. आम्ही समजून घेऊ. पण, बाहेर प्रेक्षकांना काय दिसत असेल?

सोनाली पाटीलने पहिल्या आठवड्यात नखरे केले आणि दुसर्‍या आठवड्यात फूल डाऊन. तू मध्ये कुठेच दिसत नाहीस. तुला जोडी दिल्यापासून तू.. विकासलादेखील तुला हेच सांगायचं आहे. मी काळजीपोटी सांगतोय. ही कोणाची नाही तुला कळलंय ना.. मग काही फरक पडत नाही”.

आता नक्की हे कोणाबद्दल बोलत आहेत? कोणामुळे सोनालीला त्रास होत आहे? विशाल कोणाबद्दल बोलतो आहे? हे कळेलच आजच्या भागात तेव्हा बघा बिग बॉस मराठी, आज रात्री कलर्स मराठीवर..

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content