Homeएनसर्कलशिरोड्यात हस्तकला आणि...

शिरोड्यात हस्तकला आणि विणकाम महोत्सवाचे आयोजन!

शिरोडा, पोंडा येथील केटीसी बसस्थानक येथे विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयातर्फे जिल्हा हस्तकला आणि विणकाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवसीय मिनी प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन गोव्याचे जलसंपदा विकास मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमांतर्गत हस्तकला सादरीकरण आणि जागरूकता कार्यक्रम अंतर्गत हा उपक्रम आयोजित केला जात आहे.

स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देणे आणि “आत्मनिर्भर भारत” किंवा स्वयंपूर्ण भारताची भावना वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित करणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. जिल्हा हस्तकला आणि विणकाम महोत्सव दक्षिण गोव्यातील शिरोडा मधील कारागिरांना त्यांची असाधारण कारागिरी आणि कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल. हँड एम्ब्रॉयडरी आणि क्रोशे, दागिने, चित्रे, नारळ, टेराकोटा आणि बरेच काही या हस्तकला प्रदर्शनात असून विक्रीसाठी उपलब्ध असतील.

अभ्यागत थेट प्रात्यक्षिके देखील पाहता येतील, परस्पर संवाद साधता येईल. स्थानिक कलाकुसरींना प्रोत्साहन आणि चालना  देण्यासाठी, पारंपरिक कौशल्ये आणि सर्जनशीलतेच्या या उत्सवात कारागीर तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धादेखील आयोजित करण्यात आल्या आहेत.

जिल्हा हस्तकला आणि विणकाम महोत्सव हा दक्षिण गोव्याचा समृद्ध वारसा दाखवणारा संस्कृती, कला आणि वाणिज्य महोत्सव आहे. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू राहील.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content