भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या हॅलोनिक्स टेक्नॉलॉजीजने भारतातील पहिला ‘अप-डाउन ग्लो’ एलईडी बल्ब बाजारात आणत असल्याची घोषणा केली. नावाप्रमाणेच, बल्बचा शीर्ष भाग (डोम) आणि तळाचा भाग (स्टेम) वेगवेगळ्या रंगांमध्ये चमकतात. या अनोख्या रचनेमुळे ग्राहकांना आपल्या खोलीत तीन वेगवेगळ्या स्विच सक्षम मोडद्वारे प्रकाशरुपी जादूई भास निर्माण करण्याचे विविध पर्याय मिळतात.

दहा वॅटचा ‘अप-डाऊन ग्लो’ एलईडी बल्बचे प्रत्येकी तीन लाइटिंगच्या मोडसह दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात खोली पांढऱ्या, उबदार आणि मिश्रित प्रकाशाने उजळून निघते, तर दुसरा प्रकार पांढरा, निळा आणि मिश्रित प्रकाश पर्याय प्रदान करतो. पहिल्या मोडमध्ये शीर्षस्थानी (घुमट) एक तेजस्वी 10 वॅट प्रकाश चमकतो. पुढील मोडवर जाण्यासाठी स्विच बदलल्यास तेथे निळा/उबदार पांढरा प्रकाश दिसतो. त्यामुळे भिंती आल्हाददायक आणि नेत्रदीपक रंगाने उजळून निघतात. वर चमकदार पांढरा प्रकाश आणि तळाशी (स्टेम) शांत निळा/उबदार पिवळा प्रकाश मिळविण्यासाठी स्विच पुन्हा एकदा बदलताच खोलीतील वातावरणाला एक अद्वितीय रूप प्राप्त होते.
संपुर्ण वर्तुळाकार रुपातील प्रकाशमानता सातत्य प्रदान करताना खोलीतील प्रकाशाला एक आगळेवगळे रुप देते. या बल्बची रचना अतिशय सहजसोपी आणि सुटसुटीत असल्याने बाजारातील प्रचलित बल्ब होल्डर्समध्ये त्याला सहजपणे बसविता येते.

नवीन बल्बच्या बाजारातीलआगमनाबद्दल बोलताना हॅलोनिक्स टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक राकेश झुत्शी म्हणाले, घरातील प्रकाशासाठी आम्ही नेहमीच नाविन्यपूर्ण आणि अनोख्या उपायांना प्राधान्य दिलेले आहे. विशेषत: किफायतशीर प्रकाश साधनांच्या शोधात असणाऱ्या आधुनिक काळातील ग्राहकांसाठी ‘अप-डाउन ग्लो’ एलईडी बल्ब हा या प्रयत्नातील आमचे पुढचे महत्वाचे पाऊल आहे. आमचा संशोधन-विकास तसेच डिझाईन तज्ज्ञांचा समर्पित चमू नवनवीन शक्यतांना आकार देत त्या प्रत्यक्षात आणताना भारतीय बाजारपेठेसाठी मिळतेजुळते अत्याधुनिक उत्पादने तयार करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.
हॅलोनिक्सने केलेल्या बाजार संशोधनामधून असे दिसून आले आहे की, ग्राहक बहुआयामी प्रकाशयोजना शोधत आहेत. दैनंदिन कामकाज करताना डोळ्यांवर ताण न येता त्यांना प्रकाश हवा आहे. टीव्ही पाहताना /संगीत ऐकताना त्यांना खोलीत आल्हाददायक प्रकाश हवा आहे. तर सामाजिक सोहळ्याप्रसंगी त्यांना तेथील सजावटीत भर टाकणार प्रकाश हवा आहे. ‘अप-डाउन ग्लो’ एलईडी बल्बसारख्या अष्टपैलू उत्पादनात या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी त्याची विशेष तांत्रिक रचना करण्यात आलेली आहे.
हॅलोनिक्सचा ‘अप-डाऊन ग्लो’ एलईडी बल्ब देशभरातील सर्व आघाडीचे ई-कॉमर्स मंच आणि इलेक्ट्रिकल रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. या बल्बची स्पर्धात्मक किंमत फक्त 299 रुपये आहे. हे दोन प्रकार ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करतील. नवीन मापदंड निश्चित करून, हे उत्पादन हॅलोनिक्सच्या हरिद्वार येथील अत्याधुनिक प्रकल्पात तयार केले जाईल. या नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी पेटंट अर्ज, डिझाइन, ट्रेडमार्क आणि डोमेन नाव सध्या प्रक्रियेत आहे.