दुप्पट आव्हानं आणि दुप्पट अडथळे घेऊन काल सुरू झाला बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धेचा दुसरा आठवडा. जोडी की बेडी, ही या आठवड्याची थीम असून काल बिग बॉसने सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या. संपूर्ण आठवडाभर सदस्यांना या जोड्यांसोबतच राहणे अनिवार्य असणार आहे. कालच असे जाहीर करण्यात आले.

काल बिग बॉसच्या घरामध्ये बर्याच गोष्टी घडल्या. एकमेकांना सल्ले देणे, स्ट्रॅटेजी सांगणे, दुसर्या ग्रुपमध्ये दाखल होणं, असे बरेच काही.. बघायला मिळाले. तसंच बिग बॉसने सदस्यांवर “नावं मोठे लक्षण खोटे” हे नॉमिनेशन कार्य सोपवले. ज्यात या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झालेले जय, गायत्री, विशाल, विकास, आविष्कार, मीनल आणि शिवलीला, यांचा समावेश आहे. काल मीनल आणि स्नेहामध्ये मोठा वाददेखील झाला. दोघींनी आपापले मुद्दे सदस्यांसमोर मांडले.
नाव मोठे लक्षण खोटे, नॉमिनेशन कार्यात घरातले अपुरे योगदान, घरातला वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर घरातल्या सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले आहे. नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की, त्यांचे योगदान अधिक आहे आणि याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉसने दिली.

सुरक्षित सदस्यांपैकी कोणता सदस्य नॉमिनेट व्हायला हवा होता हे कारणांसहीत सांगायचे आहे असे जाहीर केले. याच कार्यामध्ये स्नेहा आणि मीनलमध्ये भांडण झाले. आज जय, विकास आणि शिवलीला आपापली मते मांडताना दिसणार आहेत.

जय म्हणतो, “सोनाली मी तुझं नाव घेईन. तू खूप स्ट्राँग प्रतिस्पर्धी आहेस. तू मला खेळात मात देशील आणि म्हणून मी तुला घाबरतो. मी मस्ती नाही करत. मी खरं बोलतोय. मी तुला कॉम्पिटिटर म्हणून घाबरतो, असं मी तुला तोंडावर सांगतो. या प्रक्रियेत विकासने स्नेहाचे नाव घेतले.

शिवलीला पाटील म्हणाल्या, “मला मान्य आहेत सगळ्या गोष्टी. मला गेम कळायला थोडा वेळ लागला. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल. बिग बॉसचं घर फक्त भांडणाचं घर आहे, इथे फक्त काड्या, कुचर्या एवढचं केलं जातं, असं प्रत्येकजण म्हणतं. मी असा विचार करून आले होते, की जेव्हा इथे येईन तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले ना तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन ना, त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल”.

आज घरामध्ये होणार आहे “हल्ला बोल”.. हा टास्क नक्की काय असणार आहे? या टास्कमधून सदस्यांना काय मिळणार आहे? हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून असे दिसते की, एका टीममधील दोन सदस्य मोटरबाईकवर बसणार आहेत आणि दुसर्या टीममधील सदस्य त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रोमोमध्ये मोटर बाईकवर बसलेली पहिली जोडी आहे सोनाली आणि सुरेखा कुडची यांची तर दुसरी जोडी आहे विशाल आणि विकासची.

या बसलेल्या सदस्यांवर पाण्याचा मारा होताना दिसतोय, धूर देण्यात येत आहे. म्हणजेच त्यांना त्या मोटर बाईकवरुन उतरवण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात येणार आहे. बघूया या हल्ला बोल, टास्कमध्ये कोणाची टीम विजयी होणार?

हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी. आज रात्री कलर्स मराठीवर.


