Homeचिट चॅटस्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक...

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक मुळगावकर यांचे निधन

मुंबईच्या वैद्यकीय वर्तुळात निष्णात स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे दहिसर येथील सुश्रूत इस्पितळाचे संचालक डॉ. अशोक मुळगावकर यांचे काल सायंकाळी हिंदुजा इस्पितळात न्युमोनियाच्या तीव्र संसर्गाने निधन झाले.

ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अपर्णा, पुत्र हृषिकेश, कन्या मुग्धा असा परिवार आहे. वैद्यकीय व्यवसायाकडे एक समाजकार्य म्हणून पाहात आलेल्या डॉ. मुळगावकर यांनी वसई तालुक्यापासून आपल्या सेवेला प्रारंभ केला. १९७८ सालच्या सुमारास त्यांनी दहिसर पूर्व येथे सुश्रूत इस्पितळाची उभारणी करून लाखो रुग्णांवर उपचार केले.

डॉ. मुळगावकर दहिसर स्पोर्टस फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य आणि कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने आपण एक कुशल संस्थाचालक आणि जवळचा मित्र गमावला, अशी शोकसंवेदना शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केली आहे.

दहिसरच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कलाकार, खेळाडूंना प्रोत्साहित करणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये डॉ. मुळगावकर यांचा समावेश होता. त्यांचे या क्षेत्रातील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अजोड असून आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांसाठी ते एक आधारवड होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content