Homeकल्चर +ग्वाल्हेर ठरली क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक!

ग्वाल्हेर ठरली क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक!

संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय संगीत दिन साजरा करत आहे. असे असताना, मध्य प्रदेश टुरिझम बोर्ड राज्याची जीवंत संगीत शैली जगाला दाखवत आहे. कलात्मक संरक्षणाचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या ग्वाल्हेर शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कने (यूसीसीएन) क्रिएटिव्ह सिटी ऑफ म्युझिक म्हणून नुकतेच घोषित केले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विकासात ग्वाल्हेरचे मोठे योगदान अधोरेखित करणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.

ग्वाल्हेरचे सिंधिया शासक महाराजा श्रीमंत दौलतराव सिंधिया यांनी १८२५मध्ये हिंदू स्थापत्य शैलीत बांधलेला ग्वाल्हेरचा मोतीमहल किंवा मोती पॅलेस ही ग्वाल्हेरच्या इतिहासातील प्रमुख वास्तूंपैकी एक आहे.मध्य प्रदेश पर्यटन मंडळ या वारसास्थळाचे रूपांतर संगीत संग्रहालयात करण्यासाठी प्रयत्नशील आहे  जेथे ग्वाल्हेरच्या समृद्ध संस्कृतीचे पुनरावलोकन केले जाऊ शकते. या प्रकल्पाचे रूपांतर ग्वाल्हेरमधील  सर्वाधिक भेट दिलेल्या सार्वजनिक जागेत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सांस्कृतिक मंत्रालयाने संगीत संग्रहालयासाठी अनुदान मंजूर केले आहे. मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने  संगीत संग्रहालयासाठी पाठविलेल्या प्रस्तावांना संग्रहालय अनुदान योजनेंतर्गत तज्ज्ञ समितीने शिफारस  केलेल्या आर्थिक मदतीसाठी मान्यता देण्यात आली आहे. म्युझियममध्ये संगीत आणि कलाप्रेमींसाठी  प्राचीन वाद्ये प्रदर्शित केली जाणार आहेत.

मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रधान सचिव आणि मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवशेखर शुक्ला म्हणाले की, ग्वाल्हेरला युनेस्कोक्रिएटिव्ह सिटी ऑफ  म्युझिकचा दर्जा मिळणे हा मध्य प्रदेशच्या समृद्ध संगीत वारशाचा पुरावा आहे. संगीत प्रेमींसाठी मध्य  प्रदेशात प्रवासाचा अनोखा अनुभव आहे. ग्वाल्हेर तानसेनच्या वारशाला वाहिलेल्या तानसेन समारंभाच्या माध्यमातून आपला सांगीतिक वारसा साजरा करते. राजधानी भोपाळमध्ये लोकरंग महोत्सवासारखे  कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात राज्याच्या वैविध्यपूर्ण लोक आणि आदिवासी संगीताचे दर्शन घडते.

Continue reading

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...
Skip to content