सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना गुरू संगीताचार्य रूपाली देसाई यांना कथ्थक शैलीतील, श्री गणेशाचे अधिष्ठान, त्यांच्या संगीताचार्य विषयासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या मानाच्या एकूण आठ पुरस्कारांनी नुकतेच अलंकृत करण्यात आले आहे.

संगीत क्षेत्रातील गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्करदेखील त्यांनी संपादित केला आहे. गेली अनेक वर्षे त्या एक उत्तम नृत्यांगना म्हणून सुपरिचित आहेतच. गेली २५ वर्षांहून अधिक काळ त्या संस्कृती, नृत्य, कला, मंदिर, दादर येथे अनेक विद्यार्थ्यांना घडवित आहेत. त्यांना तेज तपास्विनी पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. सध्या कथ्थक नृत्यशैलीतील श्री गणेशाचे अधिष्ठान हा त्यांचा पीएचडी विषयावर आधारित कार्यक्रम गाजत आहे. त्या कार्यक्रमाच्या नृत्य दिग्दर्शनाची बाजू त्यांच्या ज्येष्ठ शिष्या दिशा देसाई यांनी समर्थपणे केली आहे.

