ग्रंथाली प्रकाशित “ना ते आपुले” डॉ. विजयकुमार देशमुखलिखित नाटकाचं अभिवाचन आणि प्रकाशन विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या विशेष उपस्थितीत येत्या शनिवारी, दि. ७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. मुंबईत वांद्रे पश्चिम इथं होणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सारिका निलाटकर-नवाथे, लेखिका डॉ. स्मिता दातार, सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पानबुडे आदी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी दिली आहे. ख्यातनाम अभिनेते संजय कुलकर्णी यांच्यासह, ऋचा देशमुख, उमेश घळसासी, ज्ञानेश्वरी देशपांडे, आशिष कुलकर्णी, राखी राणे हे रंगकर्मी या नाटकाचं अभिवाचन करणार आहेत.

शनिवार, दि. ७ जानेवारी २०२३, सायंकाळी ६ वा. वेळेवर कार्यक्रम सुरू होईल. “ग्रंथाली प्रतिभांगण”, आयडेंटीटी बिल्डिंग, केन रोड, मन्नत बंगल्याजवळ, बॅन्डस्टॅन्ड, वांद्रे (पश्चिम) मुंबई इथं हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्था तसंच नाट्य रसिकांनी अगत्यानं उपस्थित राहवं, असं आवाहन लेखक आणि दिग्दर्शक डॉ. विजयकुमार देशमुख यांनी केलं आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून अधिक माहितीसाठी ९३२०३०४०५९ किंवा ९८२१७७६४६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन ग्रंथाली प्रकाशननं केलं आहे.

