मुंबईतली सर्वात मोठी वीज वितरण कंपनी अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून (एईएमएल) मुंबईच्या ग्राहकांसाठी हरित ऊर्जा सादर करण्यात आली आहे. हरित ऊर्जेच्या वापरासाठी ग्राहकांनी पुढे यावे याकरीता कंपनीने आकर्षक योजनाही जाहीर केली आहे.
एईएमएल २०२३पर्यंत अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून ३० टक्क्यांहून अधिक ऊर्जा आवश्यकतांची पूर्तता करणार आहे. एमईआरसीकडून अगोदरच मान्य करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या माध्यमातून ही क्षमता ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी १,००० मेगावॅट ऊर्जा खरेदीचा प्रस्ताव एमईआरसीला सादर करण्यात आला आहे. यापैकी ५१ टक्क्यांहून अधिक ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडून खरेदी करण्यात येणार आहे.
एईएमएल ग्राहक पुढील गोष्टींचा लाभ घेऊ शकतात
१. अतिरिक्त ६६ पैसे भरुन एमईआरसीने घोषणा केलेल्या योजनेप्रमाणे १०० टक्के अपारंपरिक ऊर्जा खरेदी करू शकतात.
२. एईएमएल ग्राहकांना अपारंपरिक ऊर्जा (आरई) प्रमाणपत्रे देईल. वित्तीय वर्ष २०२२-२३च्या अखेरपर्यंत राजस्थानमधील संकरित सौर व पवन ऊर्जा प्रकल्पातून एईएमएलला ७०० मेगावॅट ऊर्जा पुरवठा मिळेल. याशिवाय अतिरिक्त १,००० मेगावॅट ऊर्जा खरेदीचा प्रस्ताव एमईआरसीला पाठवण्यात आला आहे, ज्यात बहुतांश ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतातून मिळवण्यात येईल.
एमईआरसीच्या आदेशानुसार एईएमएलचे ग्राहक (महाराष्ट्रातील इतर सर्व वितरण कंपन्यांप्रमाणे) प्रति युनिट ६६ पैसे अतिरिक्त दर देऊन त्यांच्या ऊर्जा गरजांची पूर्तता १००% अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात.
एईएमएलचा नवीन उपक्रम जगभर व्याप असलेल्या ग्राहकांना उपयुक्त ठरेल. ज्या ग्राहकांनी आपल्या ऊर्जा गरजेपैकी २५% किंवा अधिक ऊर्जा अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे त्यांना हे ध्येय आरई प्रमाणपत्रांच्या माध्यमातून पूर्ण करता येऊ शकते. हे नाविन्यपूर्ण पाऊल त्यांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयांची पूर्तता करण्याकरिता उपयुक्त ठरू शकते.
मुंबई हरित ऊर्जा उपक्रमाच्या माध्यमातून एईएमएलचे कॉर्पोरेट ग्राहक प्रत्यक्ष अपारंपरिक ऊर्जा पुरवठा व अप्रत्यक्ष ऑफसेट्सच्या संयोजनाच्या माध्यमातून त्यांच्या शाश्वत विकासाच्या मुंबई, देश आणि जागतिक पातळीवरील ध्येयांच्यी पूर्तता करण्यासाठी सक्षम ठरतील.
एईएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचलाक कंदर्प पटेल म्हणाले की, ‘कंपनीने त्यांच्या अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये लक्षणीय वाढ केलेली असून एईएमएल ग्राहकांना त्यांच्या ऊर्जेचा स्रोत निवडण्यामध्ये ही वाढ सक्षम करेल. त्यामुळे हरित इलेक्ट्रॉन्स प्रत्येकासाठी उपलब्ध होतील आणि हरित ऊर्जा परिवर्तनाला चालना मिळेल. आम्ही कोणतेही बदल किंवा अडथळ्यांशिवाय मुंबईमध्ये १०० टक्के हरित ऊर्जा पुरवठा व प्रमाणपत्रे मिळण्याची खात्री देऊ शकतो. आम्ही अपारंपरिक ऊर्जा संधींचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी आणि त्यांची शाश्वत विकास ध्येये संपादित करण्यासाठी सर्व ग्राहकांकरिता अनुकूल अपारंपरिक ऊर्जा पर्यायाची निर्मिती करू.
मुंबई हरित उर्जा उपक्रम (मुंबई ग्रीन एनर्जी इनिशिएटिव्ह) हा पूर्णपणे ऐच्छिक उपक्रम आहे आणि एईएमएलच्या सर्व विद्यामन व संभाव्य ग्राहकांसाठी खुला आहे. सर्व विद्यमान व नवीन ग्राहक सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. एईएमएल अपारंपरिक ऊर्जेच्या स्रोतातून पूर्तता करण्यात आलेल्या ऊर्जा आवश्यकतेची टक्केवारी (%) सांगणारी मासिक प्रमाणपत्रे ग्राहकांना देण्यात येतील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी www.adanielectricity.com किंवा www.adanielectricity.com / ला भेट द्या.