एका आठवड्याआधी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, जवळच्या व्यक्तीचे आगमन बिग बॉस मराठीच्या घरात झाले. ती व्यक्ती म्हणजे आजी. इतक्या कमी वेळेतही सगळेच सदस्य आजीशी मनाने जोडले गेले. सदस्यांनी आजीसोबत बराच वेळ घालवला. तिच्यासमोर थोडी भांडणे झाली. आजीचा खाऊ सगळ्यांनी मिळून खाल्ला. तिच्याशी गप्पा मारल्या.. पण आज वेळ आली आहे घरामधून आजीला निरोप देण्याची.
आजीचा आवाज पुन्हा एकदा आणि शेवटचा घरात घुमला… आजी म्हणाली, “मला इथे येऊन एक आठवडा झालासुद्धा. चला म्हणजे आता निरोप घ्यायची वेळ आली आहे… माझी इच्छा आहे की, तुम्ही तुमच्या आजीला जे काही सांगायचे राहून गेलं असेल ते सांगाना…”

आजीच्या या घोषणेनंतर प्रत्येक सदस्याला अश्रू अनावर झाले… सगळेच सदस्य अत्यंत भावूक झाले. मीराने आपल्या भावना, खंत, तक्रार आजीसमोर मांडली. मीरा म्हणाली, “आजी माझी तक्रार आहे तुमच्याकडे.. खूप लवकर गेलात तुम्ही. जेव्हा पूर्ण जगाशी मी एकटी लढत होते, कोणीही नव्हतं माझ्याबरोबर.. तेव्हा मला वाटायचं… माझी आईदेखील म्हणायची जर आजी असती तर तुझ्याबरोबर असती. मी जिथे राहिली असती तिथे ती राहिली असती. अगदी १६ – १७ वयाची मी असताना तू गेलीस आणि त्याच्यानंतर सगळ्या जगासोबत मी एकटी लढली आहे तुझ्याशिवाय…
पण इथे बिग बॉसच्या आजीला बघितल्यावर मला एक वेगळं असं कनेक्शन वाटलं होतं… म्हणजे समोर आहे बसं एव्हढंच हवं आहे. बाकी काही नसेल तरी चालेल. बस दिसत राहा कधी कधी…

बघूया अजून कोणत्या सदस्यांनी आपल्या मनातल्या भावना आजीसमोर व्यक्त केल्या त्या..
अबब… सोनालीचा राग पुन्हा एकदा अनावर… विशालच्या कुठल्या निर्णयामुळे आणि कोणत्या कृतीमुळे सोनालीला इतकं वाईट वाटलं आहे? बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये रूसवे–फुगवे होतच असतात… आपली जवळची व्यक्ती थोडं जरी वेगळं वागली, त्यांचा निर्णय आपल्या निर्णयापेक्षा वेगळा असला किंवा आपल्याला त्यांनी साथ दिली नाही तर लगेच सदस्यांना वाईट वाटतं. असंच काहीसं आज सोनाली आणि विशालमध्ये घडणार आहे.

घरामध्ये विशाल आणि सोनालीची भांडणं, मस्करी सुरूच असते. पण आजची गोष्ट सोनालीच्या मनाला खूपच जास्त लागली आहे असं तिच्या बोलण्यावरून दिसून येतं. सोनाली विशालला म्हणते, जर मी तुझ्यामध्ये टाईम इनव्हेस्ट करते तर मला तुझ्याकडून रिटर्नची अपेक्षा आहे. विशाल म्हणतो, मी नाही करत का टाईम इनव्हेस्ट. सोनाली त्यावर म्हणते, त्यांच्यातल्या ग्रुपमधील सदस्यांनी कोणाचं, दुसर्याचं नाव घेतलं का? तू का नाही माझं नाव घेतलंस.
विशालचं म्हणणं आहे, मला जे वाटलं ते मी केलं. सोनाली म्हणते, उत्कर्ष म्हणतो सोनालीचा घसा… विशाल तोच मुद्दा उचलून म्हणतो, त्याचं मत आणि माझं मत क्लियर नको करूस.

सोनाली म्हणते, पहिल्या आठवड्यात माझा आवाज मोठा आहे म्हणून बोललं गेलं. तेव्हापासून तुला माहिती आहे, बाकीच्यांना नसेल माहिती, एखादवेळेस… तू फालतू रिझन… विशाल म्हणतो, फालतू नाहीये रिझन, तू माझ्या रिझनला फालतू नाही म्हणू शकत. सोनाली म्हणते, फालतूचं आहे रिझन. तुला ना माणसांची किंमत नाहीये. खूप कमी किंमत आहे. तुझे स्टेटमेंट त्या व्यक्तींपेक्षा मोठे असतात. तुझं म्हणणं त्या व्यक्तींपेक्षा मोठे असतं. तुझी सिचुएशन त्या व्यक्तीवर काय बेतलेलं आहे, त्यापेक्षा मोठी असते. आणि प्रत्येकवेळेला असं झालेलं आहे.
आता नक्की या दोघांमधील वाद कधी मिटेल? विशाल त्याचं म्हणणं सोनालीला पटवून देऊ शकेल? नक्की विशालने काय रिझन दिले आहे? सोनालीला इतकं वाईट का वाटलं आहे? जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी. आज रात्री कलर्स मराठीवर..

