Friday, February 14, 2025
Homeडेली पल्सराष्ट्रीय शालेय बँड...

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचा आजपासून महाअंतिम सोहळा

प्रजासत्ताक दिनानिमित्त संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आज 21 आणि उद्या 22 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल क्रीडांगणावर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतीय संगीत आणि सुरावटींना लोकप्रिय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात प्रत्येक विभागांमधून प्रत्येकी चार (पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर) असे एकूण 16 बँड संघ आपले संगीत कौशल्य प्रदर्शित करत परस्परांशी स्पर्धा करतील.

ही स्पर्धा चार प्रकारात ( मुलांचा ब्रास बँड, मुलींचा ब्रास बँड, मुलांचा पाईप बँड आणि मुलींचा पाइप बँड) होणार आहे. महाराष्ट्रामधून मुंबईतल्या डॉन बॉस्को प्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ या अंतिम फेरीतील 16 संघांमध्ये समाविष्ट आहे.

S NoSchoolCategory
1Andhra Pradesh Social Welfare Residential School, Arugolanu, West Godavari, Andhra PradeshPipe Band Boys
2Maharaja Agarsain Public School, Ashok Vihar, North Delhi
3Govt. Mizo High School, Aizawl, Mizoram
4PM SHRI School Jawahar Navodaya Vidyalaya, Suratgarh,Sriganganagar, Rajasthan
5St. Teresa’s Higher Secondary School, Kannur, KeralaBrass Band Girls
6St. Xavier’s Higher Secondary School, Pathaliaghat, Sepahijala, Tirpura
7City Montessori School, Kanpur Road Campus, Lucknow, Uttar Pradesh
8Carmel Convent Senior Secondary School, Bhopal, Madhya Pradesh
9Queen Mary’s School, Tis Hazari, New DelhiPipe Band Girls
10Shri Swaminarayan Kanya Vidya Mandir, Bhuj, Gujarat
11Droupadi Girls High School, Nishaposi, Mayurbhanj, Odisha
12PM SHRI Kendriya Vidyalaya MEG & Centre, St. Johns Road Sivan Chetty Garden, Bengaluru, Karnataka
13DAV Public School, Hamirpur, Himachal PradeshBrass Band Boys
14Don Bosco High School & Junior College, Vikhroli, Mumbai, Maharashtra
15Amalorpavan Higher Secondary School, Vanarapet, Pondicherry, Puducherry
16Govt. Sr. Secondary School, West Point, Gangtok, Sikkim

प्रत्येक गटातील अव्वल तीन संघांना रोख पारितोषिक (पहिले – 21,000 रुपये, द्वितीय – 16,000 रुपये तर तृतीय – 11,000 रुपये), एक करंडक, तसेच प्रमाणपत्रे दिली जातील. प्रत्येक गटातील उर्वरित संघाला प्रोत्साहनपर प्रत्येकी 3,000 रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. या महाअंतिम सोहळ्यासाठी ज्युरी अर्थात परीक्षकांची निवड संरक्षण मंत्रालयाद्वारे केली जाईल आणि यामध्ये सशस्त्र दलाच्या प्रत्येक विभागातील सदस्याचा समावेश असेल.

ही स्पर्धा तीन स्तरांवर राज्य, विभागीय आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे सर्व शाळांसाठी (सीबीएसई,आयसीएसई, केव्हीएस, एनव्हीएस आणि सैनिकी शाळा इ.) आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत 12,857 मुलांचा समावेश असलेल्या 486 संघांनी भाग घेतला, तर विभागीय स्तरावर 2,002 मुलांचा समावेश असलेल्या 73 संघांनी भाग घेतला. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि एकतेची भावना जागृत करणे आणि त्यांना सर्वांगीण शिक्षणाच्या मार्गावर प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Continue reading

शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ...

जे. जे. उड्डाणपुलाखाली उभ्या राहणार बेस्टच्या ३ कालबाह्य डबलडेकर!

मुंबईतल्या कुतुब-ए-कोंकण मकदूम अली माहिमी म्हणजेच जे. जे. उड्डाणपुलाखालील संपूर्ण २.१ किलोमीटर लांबीच्‍या रस्‍ता दुभाजकाचे संकल्‍पना आधारित (थीम बेस्‍ड्) सुशोभिकरण करावे, तेथे ध्‍वनीप्रदूषणास प्रतिबंध ठरू शकणारी झाडे लावावीत, आकर्षक बागकामे (लॅण्‍डस्‍केपिंग) करावी, एकसमान रचनेचे मजबूत संरक्षक कठडे (रेलिंग) उभारावेत,...
Skip to content