Homeमुंबई स्पेशलराज्यपालांनी केले ‘पिकलबॉल’...

राज्यपालांनी केले ‘पिकलबॉल’ प्रदर्शनी सामन्याचे उद्घाटन

फिटनेसच्या दृष्टीने लोकप्रिय होत असलेल्या पिकलबॉल खेळाच्या प्रदर्शनी सामन्याचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांनी काल राजभवन येथे केले.

पिकलबॉल हा एक इनडोअर किंवा आउटडोअर रॅकेट/पॅडल स्पोर्ट आहे, ज्यामध्ये दोन खेळाडू किंवा चार खेळाडू, पॅडल्सचा वापर करून मध्यभागी असलेल्या 34-इंच-उंच जाळ्यावर छिद्रित पोकळ प्लास्टिक बॉल मारतात. एका बाजूने नियमांचे उल्लंघन होईपर्यंत नेटच्या दोन्ही बाजूचे विरोधक चेंडू मागे-मागे मारतात.

पिकलबॉल

पिकलबॉल कोर्ट आणि खेळण्याची पद्धत काही बाबतींत टेनिस सारखी असते आणि इतर बाबतीत पिंग-पॉन्ग (टेबल टेनिस). कोर्ट हे दुहेरी बॅडमिंटन कोर्टच्या आकाराचे असते (टेनिस कोर्टच्या आकाराच्या एक तृतीयांशपेक्षा कमी), आणि पॅडल टेबल टेनिसमध्ये वापरल्या जाणार्‍या कोर्टापेक्षा मोठे असते. नियम आणि कोर्टवरील रेषांची स्थिती, पिकलबॉलसाठी विशिष्ट आहेत.

पिकलबॉल हा खेळ बॅडमिंटन, टेबल टेनिस व लॉन टेनिस यांचे मिश्रण आहे. आज ६०पेक्षा अधिक देशात पिकलबॉल खेळला जातो व कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला तो खेळता येतो असे ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी सांगितले. पिकलबॉल क्रीडा प्रकार सर्व शाळांमध्ये सुरू करावा या दृष्टीने आपण राज्याच्या क्रीडामंत्र्यांना सूचना करू तसेच विद्यापीठ स्तरावरदेखील पिकलबॉल खेळाला चालना देण्यासाठी कुलगुरुंना सूचित करू. कालांतराने या खेळाच्या माध्यमातून भारताने एशियन स्पर्धा तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशासाठी पदक प्राप्त करावे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सादर केलेले खेळाचे प्रात्यक्षिक पाहिले व उपस्थितांशी संवाद साधला. प्रदर्शनी सामन्याला ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू,  संस्थापक संचालक सुनील वालावलकर, महासचिव चेतन सनील, कोषाध्यक्ष निखिल मथुरे, महाराष्ट्र पिकलबॉल एसोसिएशनचे अध्यक्ष यशोधन देशमुख व मुंबई पिकलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक सप्रे उपस्थित होते.    

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content