Homeकल्चर +प्राचीन शिलाई जहाज...

प्राचीन शिलाई जहाज बांधणी पद्धत होणार पुनरुज्जीवित!

अनेक शतके जुनी भारताची समृद्ध सागरी परंपरा शिलाई जहाज बांधणीच्या पुनरुज्जीवनाने पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. सरकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात भारतीय नौदल, सांस्कृतिक मंत्रालय आणि मेसर्स होडी इनोव्हेशन्स, गोवा, एका प्राचीन शिलाई जहाजाची पुनर्बांधणी करण्यासाठी एकत्र आले आहेत, जे भारताच्या प्राचीन सागरी व्यापार मार्गांवर एकेकाळी महासागरात वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या जहाजांची आठवण करून देतात.

भारताच्या सांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेला हा उल्लेखनीय प्रयत्न आपल्या देशाच्या समृद्ध जहाजबांधणी वारशाचे प्रतीक आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना साकारण्यासाठी विस्तृत संशोधन आणि विषयतज्ञांचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरला आहे.

हा उपक्रम विविध मंत्रालयांच्या एकत्रित प्रयत्नांनी आखण्यात आला आहे. आयोजक मंत्रालये या भारतीय नौदल जहाजाची रचना आणि बांधकामावर यावर देखरेख ठेवत आहेत. हे जहाज प्राचीन सागरी व्यापार मार्गांवरून प्रवास करणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने संपूर्ण अर्थसहाय्य केले आहे, तर जहाजबांधणी मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आंतरराष्ट्रीय प्रवासाची निर्बाध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात या प्रकल्पाला मदत करतील.

प्राचीन जहाजबांधणी परंपरेच्या स्मरणार्थ प्रकल्प म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय अंमलबजावणी समितीने 14 डिसेंबर 2022 रोजी या प्रकल्पाला मान्यता दिली.

या जहाजाच्या बांधकामातील शिलाईचे काम शिलाई जहाज बांधणीतले तज्ञ बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखालील पथक करेल. या प्राचीन तंत्राचा वापर करून, लाकडी फळ्यांना सांगाड्याच्या आकाराशी सुसंगत बनवण्यासाठी पारंपारिक वाफेच्या पद्धतीचा वापर केला जाईल. प्राचीन भारतीय जहाजबांधणी पद्धती प्रमाणे प्रत्येक फळी नंतर दोर/दोरी वापरून दुसर्‍या फळीला शिवली जाईल, नारळाच्या फायबर, राळ आणि माशाच्या तेलाच्या मिश्रणाने बंद केली जाईल.

जहाज तयार झाल्यानंतर, भारतीय नौदलाकडून प्राचीन दिशादर्शक तंत्राचा वापर करून पारंपारिक सागरी व्यापार मार्गांवरून एक अनोखा प्रवास केला जाईल.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content