Homeडेली पल्ससरकारला जीएसटीमधून ऑगस्टमध्ये...

सरकारला जीएसटीमधून ऑगस्टमध्ये मिळाले 1.59 लाख कोटी!

ऑगस्ट, 2023 महिन्यात एकूण जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर 1,59,069 कोटी रुपये जमा झाला, ज्यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्राचा वस्तू आणि सेवा कराचा वाटा 28,328 कोटी रुपये आहे. तर एसजीएसटी अर्थात राज्यांचा वस्तू आणि सेवा कराचा वाटा 35,794 कोटी रुपये, आयजीएसटी अर्थात, राज्य राज्यांमध्ये व्यवहारातून मिळणारा एकात्मिक वस्तू आणि सेवा कराचा वाटा 83,251 कोटी रुपये एवढा होता (ज्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर कर रुपात मिळालेल्या 43,550 कोटी रुपयांचा समावेश आहे) त्याचबरोबर सेस कराच्या रूपाने 11,695 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. (ज्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर कर स्वरूपात मिळालेल्या 1,016 कोटी रुपये महसुलाचा समावेश आहे).

महाराष्ट्रात वर्ष दर वर्ष प्रमाणात वर्ष 2022 च्या ऑगस्ट महिन्यात 18863 कोटी एवढा जीएसटी महसूल जमा झाला होता तर वर्ष 2023 च्या ऑगस्ट महिन्यात राज्यात 23282 कोटी रुपये जीएसटीच्या रूपाने प्राप्त झाले, तर गोवा राज्यात 2022 ऑगस्ट महिन्यात 376 कोटी रुपये महसूल जमा झाला होता तर वर्ष 2023 च्या ऑगस्ट महिन्यात 509 कोटी रुपये जीएसटी प्राप्त झाला.

केंद्र सरकारने सीजीएसटी करातून मिळणारे 37,581 कोटी रुपये आणि एसजीएसटी करातून मिळणारे 31,408 कोटी रुपये आयजीएसटी कराच्या रूपाने चुकते केले आहेत. नियमित व्यवहारानंतर ऑगस्ट 2023 या महिन्यात केंद्र आणि राज्यांचा एकूण जमा महसूल सीजीएसटी कराच्या रूपाने 65,909 कोटी रुपये, तर एसजीएसटी कराच्या रूपाने 67,202 कोटी रुपये एवढा आहे.

महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट 2023 या महिन्यात एसजीएसटी कराच्या रूपाने 7630 कोटी रुपये जमा झाले तर आयजीएसटी कराच्या रूपाने 3841 कोटी रुपये चुकते करण्यात आले तर गोवा राज्यात ऑगस्ट 2023 या महिन्यात एसजीएसटी कराच्या रूपाने 174 कोटी रुपये जमा झाले होते त्यात आयजीएसटी कराच्या रूपाने 111 कोटी रुपये चुकते करण्यात आले.

ऑगस्ट 2023 या महिन्यामधील महसुल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलाच्या तुलनेत 11% नी जास्त आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 3% नी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात, त्याच स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 14% नी जास्त आहे.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवतो.

तक्ता-1 ऑगस्ट, 2022 या महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट, 2023 महिन्यात प्रत्येक राज्यात गोळा झालेल्या जीएसटी कराची राज्यवार आकडेवारी दर्शवितो आणि तक्ता-2,ऑगस्ट 2023 महिन्यातला एसजीएसटी कर आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त/निश्चित केलेल्या आयजीएसटी मधील एसजीएसटी वाटा दर्शवितो.

तक्ता-1: ऑगस्ट, 2023 महिन्यात जीएसटी महसुलात राज्यानुसार वर्ष दर वर्ष झालेली वाढ[1] ( कोटी रुपयांमध्ये)

State/UTAugust’22August’23Growth(%) 
Jammu and Kashmir43452321 
Himachal Pradesh709725  2 
Punjab1651181310 
Chandigarh179192  7 
Uttarakhand1094135324 
Haryana6772766613 
Delhi43494620  6 
Rajasthan33413626  9 
Uttar Pradesh6781746810 
Bihar12711379  9 
Sikkim24732029 
Arunachal Pradesh598239 
Nagaland385137 
Manipur354017 
Mizoram283213 
Tripura567840 
Meghalaya14718928 
Assam10551148  9 
West Bengal46004800  4 
Jharkhand25952721  5 
Odisha3884440814 
Chhattisgarh2442289619 
Madhya Pradesh28143064  9 
Gujarat8684976512 
Daman and Diu and Dadra and Nagar Haveli311324  4 
Maharashtra188632328223
Karnataka95831111616
Goa37650936
Lakshadweep03853
Kerala2036230613
Tamil Nadu8386947513
Puducherry20023115
Andaman and Nicobar Islands162135
Telangana3871439313
Andhra Pradesh3173347910
Ladakh192739
Other Territory224184-18
Center Jurisdiction205193-6
Grand Total10052611450314

तक्ता-2: ऑगस्ट, 2023 महिन्यात  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना निश्चित झालेल्या आयजीएसटी मधील एसजीएसटी आणि एसजीएसटी वाट्याची रक्कम (कोटीमध्ये)

State/UTSGST collectionSGST portion of IGSTTotal
Jammu and Kashmir 220 420 640
Himachal Pradesh 182 210 392
Punjab 603 1,201 1,804
Chandigarh 51 119 171
Uttarakhand 382 255 637
Haryana 1,585 1,094 2,679
Delhi 1,113 1,209 2,322
Rajasthan 1,265 1,730 2,994
Uttar Pradesh 2,378 3,165 5,544
Bihar 654 1,336 1,990
Sikkim 42 43 85
Arunachal Pradesh 40 100 140
Nagaland 23 59 82
Manipur 21 62 83
Mizoram 17 54 72
Tripura 36 84 120
Meghalaya 50 86 136
Assam 440 691 1,131
West Bengal 1,797 1,516 3,313
Jharkhand 802 120 922
Odisha 1,333 401 1,734
Chhattisgarh 710 488 1,198
Madhya Pradesh 978 1,447 2,425
Gujarat 3,211 1,723 4,933
Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 51 40 90
Maharashtra 7,630 3,841 11,470
Karnataka 3,029 2,627 5,656
Goa 174 111 285
Lakshadweep 0 2 2
Kerala 1,035 1,437 2,472
Tamil Nadu 3,301 2,212 5,513
Puducherry 43 51 94
Andaman and Nicobar Islands 10 22 33
Telangana 1,439 1,746 3,186
Andhra Pradesh 1,122 1,481 2,603
Ladakh 14 43 57
Other Territory 13 182 195
Grand Total35,79431,40867,202

[1] वस्तूंच्या आयातीवरचा जीएसटी यात समाविष्ट नाही. 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content