Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांसाठी खुशखबर! तुळशी...

मुंबईकरांसाठी खुशखबर! तुळशी तलाव वाहू लागला ओसंडून!!

मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांपैकी एक तुळशी तलाव काल मध्यरांत्रीनंतर म्हणजेच आज पहाटे ओसंडून वाहू लागला. यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहणारा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हा पहिलाच तलाव आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये आता ३९.६१ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव हा आज मध्यरात्री १.२८ वाजता ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात असून भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे.

८०४ कोटी लीटर इतकी कमाल उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२ व सन २०२१मध्ये १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. वर्ष २०२०मध्ये २७ जुलै; वर्ष २०१९मध्ये १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८मध्‍ये ९ जुलै रोजी; वर्ष २०१७मध्‍ये १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर (५,७३,३४० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ३९.६१ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावात ३,३६०.५० कोटी लीटर (३३ लाख ६०५ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. मोडक-सागर तलावात ८,१२१.४ कोटी लीटर (८१ हजार २१४ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. तर तानसा तलावात १०३०३.१ कोटी लीटर (१,०३,०३१ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयमध्ये (मध्य वैतरणा) ९८०९.५ कोटी लीटर (९८ हजार ९५ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. भातसा तलावात २३,१९२ कोटी लीटर (२,३१,९२० दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. विहार तलावात १७४२.७ कोटी लीटर (१७ हजार ७२७ दशलक्ष लीटर) पाणीसाठा आहे. आज रात्री भरून वाहू लागलेल्या तुळशी तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content