भारत सरकारने दिनांक 14 जून 2023 रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्रमांक 4(6)-B(W&M)/2023 अनुसार, सार्वभौम सुवर्ण रोखे 2023-24 (मालिका II) कालपासून खुली झाली असून ती 15 सप्टेंबर 2023पर्यंत, 20 सप्टेंबर 2023 या सेटलमेंट तारखेसह सदस्यत्वासाठी खुली होईल.

सदस्यत्व कालावधी दरम्यान रोख्यांची जारी (इश्यू) किंमत प्रति ग्रॅम रु. 5,923 (रुपये पाच हजार नऊशे तेवीस फक्त) राहील, भारतीय रिझर्व बँकेने 08 सप्टेंबर 2023 रोजी प्रकाशित केलेल्या निवेदनातदेखील हे नमूद करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू किमतीवर प्रति ग्रॅम रु. 50 (रुपये पन्नास फक्त) सूट दिली जाईल. भारतीय रिझर्व बँकेशी सल्ला मसलत केल्यावर भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांची इश्यू किंमत, प्रति ग्रॅम सोन्यासाठी रु. 5,873 (रुपये पाच हजार आठशे त्र्याहत्तर फक्त) इतकी राहील.