Homeकल्चर +मुंबई-३ केंद्रातून 'जेंडर...

मुंबई-३ केंद्रातून ‘जेंडर अॅन आयडेंटीटी’ प्रथम!

६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-३ केंद्रातून सहप्रमुख कामगार अधिकारी (पश्चिम उपनगरे) बृहन्मुंबई महानगरपालिका, या संस्थेच्या ‘जेंडर अॅन आयडेंटीटी’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच स्वराज्य फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘द फियर फॅक्टर’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. उपप्रमुख कामगार अधिकारी (पुर्व उपनगरे) बृहन्मुंबई महानगरपालिका या संस्थेच्या ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-३ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक राजेंद्र पोतदार (जेंडर अॅन आयडेंटीटी), द्वितीय पारितोषिक समीर पेणकर (द फियर फॅक्टर).

प्रकाश योजना: प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (एलिजीबीलीटी), द्वितीय पारितोषिक संजय तोडणकर (अरण्यदाह).

नेपथ्य: प्रथम पारितोषिक पंकज वेलिंग (जेंडर अॅन आयडेंटीटी), द्वितीय पारितोषिक रजनिश कोंडविलकर (पुढच्या वर्षी लवकर या).

रंगभूषा: प्रथम पारितोषिक राजेश परब (एलिजीबीलीटी), द्वितीय पारितोषिक आनंद एकावडे (सखी उर्मिला).

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक: अमित वैती (जेंडर अॅन आयडेंटीटी) आणि बकुळ धवने (द फियर फॅक्टर).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे: सविता चव्हाण (साठा पत्तौत्तराची कहाणी असफल अपूर्ण), इशा कार्लेकर (चाफा बोलेना), सोनाली जानकर (रुद्राक्षा), भारती पाटील (पुढच्या वर्षी लवकर या), मृदुला अय्यर (पुढच्या वर्षी लवकर या), अमित सोलंकी (एलिजीबीलीटी), सुचित ठाकूर (अरण्यदाह), सचिन पवार (जेंडर अॅन आयडेंटीटी), महेंद्र दिवेकर (साठा पत्तौत्तराची कहाणी असफल अपूर्ण), गौरव सातपुते (द फियर फॅक्टर).

मुंबईत गिरगावच्या साहित्य संघ मंदिर येथे दि. १६ डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी, २०२४ या कालावधीत अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. राजीव मोहोळ, बाळ बरगाळे आणि गौरी लोंढे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content