मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या रविवारी, १४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता संगीतमय गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुंबईतल्या ख्यातनाम गायिका देवश्री नवघरे यांचे गायन होणार असून त्यांना तबल्यावर यति भागवत आणि संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे यांची साथ मिळणार आहे.

संगीतप्रेमींसाठी ही एक अविस्मरणीय मैफल ठरणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, १२२-ए, जे. के. सावंत मार्ग, मुंबई ग्लास वर्क्ससमोर, माहिम, मुंबई-४०००१६ येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: २४३०४१५० / ९८२०६७२२०१


