Homeमुंबई स्पेशलमुंबईतली उद्याने, मैदाने,...

मुंबईतली उद्याने, मैदाने, चौपाट्या रात्री १० वाजेपर्यंत खुल्या!

कोविड-१९ संसर्ग परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहेत.

उद्याने

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यासह आवश्यक सर्व निर्देशांचे पालन करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे  आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

उद्याने

मुंबई महानगरातील कोविड-१९ संसर्ग स्थिती सध्या नियंत्रणात आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेदरम्यान महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांसह मुंबईकर नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे  संसर्ग स्थितीवर नियंत्रण आणणे शक्य झाले. कोविडवर नियंत्रण आणल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मिशन ब्रेक दी चेनमध्ये टप्प्याटप्प्याने उपाययोजना करून जनजीवन पूर्ववत खुले केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरातील ८६० उद्याने, ३१८ मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत खुली राहतील, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

उद्याने

सार्वजनिक ठिकाणांवर वावरताना गर्दी न करता सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. त्यासोबत प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जंतुनाशक द्रव्य (sanitizer) किंवा साबण आणि पाण्याने हातांची नियमित स्वच्छता राखणेदेखील आरोग्यासाठी हिताचे आहे. त्यामुळे नागरिकांनी या सर्व बाबींचे योग्य पालन करून पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधक निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

उद्याने

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content