Homeचिट चॅटस्कॉर्पीन जातीची चौथी...

स्कॉर्पीन जातीची चौथी पाणबुडी ‘वेला’ नौदलाकडे सुपूर्द!

‘प्रोजेक्ट-75’ या प्रकल्पातील चौथी पाणबुडी – ‘यार्ड 11878’ काल भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. स्कॉर्पीन प्रकारच्या सहा पाणबुड्या तयार करण्याचा ‘प्रोजेक्ट-75’ या प्रकल्पात समावेश आहे. या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईत ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ येथे होत असून फ्रान्सच्या मेसर्स नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने हे काम केले जात आहे.

‘वेला’ नावाच्या या पाणबुडीचे 06 मे 19 रोजी जलावतरण झाले असून, कोविडविषयक निर्बंध असूनही तिचे सर्व प्रमुख बंदरांमध्ये आणि समुद्रात परीक्षण करून झाले आहे. तसेच या पाणबुडीच्या, शस्त्रास्त्रे आणि संवेदकांशी संबंधित चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. या प्रकारापैकी तीन पाणबुड्या याआधीच भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

पाणबुडी तयार करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे व अवजारे अगदी लहान आकाराची असतात आणि त्यांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करून चालत नाही. त्यामुळे पाणबुडीची निर्मिती एक गुंतागुंतीचे काम ठरते. भारतीय यार्डामध्ये या पाणबुड्यांची निर्मिती ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हटले पाहिजे. ही पाणबुडी लवकरच भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार असून त्यामुळे नौदलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content