Homeएनसर्कलतांत्रिक वस्त्रासाठी चार...

तांत्रिक वस्त्रासाठी चार नवी मानके!

वस्त्रोद्योग मंत्रालयाने, राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान (NTTM) अंतर्गत, फिक्की आणि भारतीय मानक ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने, तांत्रिक वस्त्रासाठी मानके आणि नियमांवरील सहाव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते, ज्यात भारतातील तांत्रिक वस्त्रांसाठी मानके, गुणवत्ता नियम आणि एच एस एन कोडचे सुसूत्रीकरण यावर भर देण्यात आला आणि तांत्रिक वस्त्रासाठी चार नवी मानके घोषित करण्यात आली.

या परिषदेत, पाच तांत्रिक सत्रांचा समावेश होता ज्यात तांत्रिक वस्त्रांच्या विशेष क्षेत्रांतर्गत संरक्षणात्मक वस्त्रे, जिओटेक्स्टाइल म्हणजे भूक्षेत्र कापड, बिल्ड टेक, ओकोटेक, वैद्यकीय कापड आणि तांत्रिक वस्त्रांच्या इतर उदयोन्मुख क्षेत्रांसाठीची मानके आणि नियमांवर लक्ष केंद्रित केले गेले. एचएसएन कोड आणि मानकांचे सुसूत्रीकरण आणि QCO च्या अंमलबजावणीवर चर्चा करणारे विशेष सत्रदेखील आयोजित करण्यात आले होते.

भारतीय मानक ब्युरो (BIS) ने या परिषदेत चार नवीन मानके जारी केली–

  • IS 18266: 2023, टेक्सटाइल्स – मेडिकल रेस्पिरेटर – स्पेसिफिकेशन,
  • IS 18309: 2023 जिओसिंथेटिक्स — प्रीफॅब्रिकेटेड वर्टिकल ड्रेन फॉर क्विक सॉलिडेशन ऑफ क्विक सॉलिफिकेशन
  • सॉफ्टीलाय 18 (Softily18): 2023 टेक्सटाईल — फ्लोअर कव्हरिंग – लँडस्केपसाठी सिंथेटिक कापडापासून बनवलेले कृत्रिम गवताचे कार्पेट — स्पेसिफिकेशन
  • IS 18161: 2023, कापड — 50 किलो मोहरी, नायजर बियाणे आणि नाचणी पॅकिंगसाठी हलक्या वजनाच्या तागाच्या पिशव्या.

केंद्रीय मंत्रालये, केंद्र आणि राज्य सरकारांचे विविध विभाग, अधिकारी आणि प्रतिनिधींसह 150 हून अधिक प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले होते.

विविध संस्था, उद्योगप्रमुख, वैज्ञानिक तज्ञ, संशोधक आणि विविध श्रेणींमधील तांत्रिक वस्त्राशी संबंधित व्यावसायिक देखील या बैठकीत सहभागी झाले होते.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content