Saturday, July 13, 2024
Homeबॅक पेजप्रमेरिका लाइफतर्फे फ्लेक्सी...

प्रमेरिका लाइफतर्फे फ्लेक्सी इन्कम प्लॅन लाँच

प्रमेरिका लाइफ इन्शुरन्स, या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या जीवन विमा कंपनीने प्रमेरिका लाइफ फ्लेक्सी इन्कम योजना नुकतीच लाँच केली. ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज योजना विमाधारकाला त्यांचे आर्थिक ध्येय निश्चितपणे आणि सुलभपणे साध्य करण्यास मदत व्हावी, अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे.

प्रमेरिका लाइफ फ्लेक्सी इन्कम प्लॅन योजना प्रमेरिका २.० अंतर्गत उचलण्यात आलेले लक्षणीय पाऊल असून कंपनी सध्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. विकासाच्या या नव्या टप्प्यात प्रमेरिका लाइफ इन्शुरन्स ग्राहकांसाठी मूल्य निर्मिती करण्यासाठी बांधील असून त्यासाठी कंपनीने नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रमेरिका लाइफ फ्लेक्सी इन्कम योजनेने विमाधारकांना त्यांच्या आयुष्यातील प्रियजनांचे भविष्य किंवा आरामदायी निवृत्तीसारखे महत्त्वाचे आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी सक्षम करण्याचे ठरवले आहे. या योजनेमुळे विमाधारकांना त्यांचे पैसे वॉलेटमध्ये गोळा करून ते भविष्यात हवे तेव्हा वापरण्याची मुभा मिळते. यामुळे त्यांना आपले आर्थिक ध्येय साध्य करणे आणि बाजारपेठेतील अस्थिर वातावरणातही टिकून राहाण्यास मदत होते.

महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि लाभ:

लवकर उत्पन्न– योजनेच्या कालावधीदरम्यान नियमित उत्पन्न हवे असणाऱ्यांसाठी आणि मॅच्युरिटीवेळेस मोठी रक्कम हवी असणाऱ्यांसाठी योग्य.

लवकर उत्पन्न आणि पॉलिसी कंटिन्युएशन बेनिफिट (पीसीबी)- सुधारित संरक्षण आणि फायदे, विमाधारकाच्या मृत्यूनंतरही मिळणार

  खात्रीशीर उत्पन्न: विमा कालावधीदरम्यान खात्रीशीर उत्पन्न, मॅच्युरिटीवेळेस मोठी रक्कम, बाजारपेठेच्या जोखमीशिवाय मिळणार आर्थिक संरक्षण.

  सर्वसमावेशक कौटुंबिक संरक्षण– योजनेच्या कालावधीदरम्यान जीवन विमा कवच, प्रियजनांचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहाणार

  उत्पन्नाचं वर्ष ठरवण्याची मुभा– विमाधारकांना त्यांचे उत्पन्न विमा योजना सुरू झाल्यावर लगेच सुरू करण्याचा पर्याय

  कर लाभ– प्राप्ती कर कायद्यानुसार (बदलाच्या अधीन, कृपया कर सल्लागारांचा सल्ला घ्यावा) संभाव्य कर फायदे, भरलेला प्रीमियम तसेच मिळालेल्या लाभांवर लागू होणार

  अतिरिक्त फायदे– ऑटो कव्हर कंटिन्युअन्स, एक्स्प्रेस क्लेम रिलीफ आणि जमा व ऑफसेट पर्याय

   प्रमेरिका लाइफ इन्शुरन्सचे प्रमुख व्यवसाय अधिकारी कार्तिक चक्रपाणी म्हणाले की, प्रमेरिका लाइफ इन्शुरन्समध्ये आम्ही उद्योन्मुख भारताच्या आकांक्षा लक्षात घेण्यास प्राधान्य देतो. भारतीय नागरिक त्यांच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा आणि गरजांविषयी वेगाने जागरूक होत आहेत. प्रमेरिका लाइफ फ्लेक्सी इन्कम योजना या बदलत्या परिस्थितीनुसार तयार करण्यात आली असून त्यामध्ये खात्रीशीर उत्पन्न, सर्वसमावेशक संरक्षण आणि लवचिक पर्याय यांचा मेळ घालण्यात आला आहे. ही योजना नाविन्याच्या पलीकडे जात ग्राहकाला प्रथम प्राधान्य देणारी आहे. आर्थिक नियोजनामध्ये स्थैर्य सर्वात महत्त्वाचे असते आणि ही योजना नवीन उत्पादने तयार करून ग्राहकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याची व त्यांना विकासाची संधी देण्याची आमची बांधिलकी जपणारी आहे.

   Continue reading

   महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

   उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

   डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

   डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

   मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

   मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
   error: Content is protected !!