बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल, हा टास्क सुरू आहे. टीम ए आणि टीम बीमध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत घेताना दिसत आहेत.
आज मोटर बाईकवर बसायला येणार आहेत जय आणि गायत्री. आता विरुद्ध टीम, जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार यात शंका नाही. बघूया हा टास्क कसा रंगणार? जय आणि गायत्री किती वेळ मोटार बाईकवर बसू शकतील? विकास, विशाल, मीनल, आविष्कार, सोनाली आणि सुरेखाताई त्यांना बाईकवरुन उठवण्यात यशस्वी होतील?

विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबणाचं पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये ही टीम अजून कुठल्याकुठल्या प्रकारचे प्रयत्न करणार हे बघायला रंजक ठरेल.

टास्कदरम्यान अक्षय आणि विशालमध्ये पडणार आहे वादाची ठिणगी. अक्षयच्या अंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये होणार आहे बाचाबाची.. ज्यामध्ये अक्षय विशालला बोलणार आहे “मी दुसर्यांच्या डोक्याने नाही खेळत..”. आता हा वाद कुठे थांबणार? पुढे काय होणार? बघूया आजच्या भागात..

हल्लाबोल टास्कमुळे खूपच तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. सदस्यांचा शब्दांचा मारा ऐकायला येत आहे. पण, दादुस म्हणजेच संतोष चौधरी घरातील वातावरण हलकंफुलकं करण्याचं काम सुरुवातीपासून करत आहेत. कधी हसू आणतात, तर कधी डोळ्यात पाणी..

आज बिग बॉसच्या घरात रंगणार आहे यमकाची जुगलबंदी. त्याची सुरुवात आविष्कारपासून झाली. आविष्कारने मायक्रोवेव्हमध्ये अंडी उकाडायला ठेवली. पण त्यात पाणीच ठेवायला विसरला म्हणे.. त्यावरून दादूस यांची वाक्य सुरू झाली..

“आविष्कारने केला अंड्याचा ब्लास्ट, हा त्याचा चान्स होता लास्ट”
त्यावर मग तृप्ती देसाईदेखील म्हणाल्या, “पण, मीनल आणि सोनाली करते आहे काम फास्ट”.
दादुस लगेच म्हणाले, “यमक हीच तुमच्या लाईफची चमक”..

त्यावर मग सोनालीनेदेखील करते वाक्य “आता आमच्यासमोर कोणाची बोलायची नाही धमक”.
तृप्तीताईंना लगेच टास्कमधलं काहीतरी आठवलं असणार.
त्या म्हणाल्या “म्हणून तुम्ही काल टाकलं का नमक”?

आणि असे अनेक यमक सदस्य जुळवत केले. ही जुगलबंदी दादुस, तृप्ती देसाई, मीनल, सोनाली, आविष्कार या सदस्यांमध्ये रंगतेय.
पुढे काय होते ते पाहुया बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात. आज रात्री.. कलर्स मराठीवर..

