Sunday, June 16, 2024
Homeएनसर्कलडिझेलची तस्करी करणाऱ्या...

डिझेलची तस्करी करणाऱ्या मच्छिमारी नौकेला पकडले!

डिझेल तस्करी करणाऱ्या ‘जय मल्हार’, या मच्छिमारी नौकेला आणि तिच्यावरच्या पाच जणांना भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्र किनाऱ्याजवळ गुरूवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे 27 लाख रुपयांचे बेहिशोबी पाच टन डिझेल आणि काही प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेली नौका, पोलीस, सीमाशुल्क आणि मत्स्योद्योग विभागाकडून चौकशी करण्यासाठी मुंबई बंदरावर आणण्यात आली. नौकेवरील व्यक्तींनी आधीच 5,000 लिटर इंधन मच्छिमारांना भरसमुद्रातच विकल्याचे पुढील तपासात उघड झाले.

या यशस्वी मोहिमेमुळे समुद्रातील डिझेलची तस्करी रोखण्यात भारतीय तटरक्षक दलाला आणखी यश प्राप्त झाले आहे. गेल्या तीन दिवसात 55,000 लिटर बेहिशोबी डिझेल जप्त करण्यात आले आहे. देशाच्या सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि किनारपट्टीच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी त्वरित आणि समन्वित कृतींच्या महत्त्वावर भर देत, सागरी क्षेत्रात बेकायदेशीर कृत्यांना पायबंद घालण्यासाठी सदैव प्रतिबद्ध असल्याचे भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.  

Continue reading

अभिनयाला लाभली अध्यात्माची जोड..

अभिनय आणि अध्यात्म, याच्या बळावर अभिनेते प्रसाद ताटके यांनी असंख्य मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 'भैरोबा', 'काटा रुते कुणाला', 'कन्यादान', 'लक्ष', 'स्वप्नांच्या पलीकडले', 'माधुरी मिडलक्लास', 'क्राईम डायरी', 'श्री स्वामी समर्थ', 'दूर्वा', 'प्रेमास रंग यावे', 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'स्वराज्यजननी जिजामाता', 'सुखी माणसाचा सदरा' आणि आता...

रेवफिनची कल्‍याणी पॉवरट्रेन आणि ब्‍ल्‍यूव्‍हील्‍झसोबत भागिदारी 

रेवफिन, या भारतातील शाश्‍वत गतीशीलतेमध्‍ये निपुण असलेल्‍या अग्रगण्‍य डिजिटल लेण्डिंग प्‍लॅटफॉर्मने भारतीय लॉजिस्टिक्‍स क्षेत्रात रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक ट्रक्‍स लाँच करण्‍यासाठी भारत फोर्ज लिमिटेडची इलेक्ट्रिक मोबिलिटी शाखा कल्‍याणी पॉवरट्रेन लि. (केपीटीएल) आणि शाश्‍वत लॉजिस्टिकल सोल्‍यूशन्‍स प्रदाता ब्‍लूव्‍हील्‍झ यांच्‍यासोबतच्या सहयोगाची घोषणा केली...

‘इकोफाय’ने केली ‘ल्युमिनस’शी भागिदारी

भारताच्या हरित परिवर्तनासाठी अर्थपुरवठा करण्यास कटिबद्ध असलेली एव्हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ लाभलेली, भारताची अग्रगण्य एनबीएफसी इकोफाय ऊर्जा उपाययोजनाने उद्योगक्षेत्रातील एक सुविख्यात नाव असलेल्या ल्युमिनस पॉवर टेक्नोलॉजीजबरोबर आपल्या भागिदारीची नुकतीच घोषणा केली. ल्युमिनसजवळील अफाट अनुभव आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण उपाययोजना यांचा फायदा...
error: Content is protected !!