Homeहेल्थ इज वेल्थकॅनडाच्या साथीने जम्मूमध्ये...

कॅनडाच्या साथीने जम्मूमध्ये पहिला अफू औषध प्रकल्प!

भारतातील पहिल्या अफू औषध प्रकल्पाचा जम्मू प्रणेता ठरणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली कॅनडाच्या कंपनीसह सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत जम्मूमधील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या भारतीय एकात्मिक औषध संस्थेचा अफूवरील संशोधन प्रकल्प हा भारतातील सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे, ज्यात घातक पदार्थापासून मानवजातीच्या भल्यासाठी विशेषतः मज्जाविकार, कर्करोग आणि अपस्मारसारख्या व्याधींनी ग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त घटक बनवण्याची मोठी क्षमता आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या भारतीय एकात्मिक औषध संस्थेचा हा प्रकल्प आत्म-निर्भर भारताच्या दृष्टीकोनातून देखील महत्त्वाचा आहे कारण सर्व मंजुऱ्या मिळाल्यानंतर, विविध प्रकारचे मज्जाविकार, मधुमेहाच्या वेदना इत्यादींसाठी निर्यात योग्य औषधे या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पादित केली जाऊ शकतात असं सिंह यांनी सांगितलं.

जम्मू आणि काश्मीर तसंच पंजाब अंमली पदार्थांच्या सेवनाने ग्रस्त असून अशा घातक पदार्थाच्या अनेक व्याधी आणि इतर आजारांनी बाधित असलेल्या रुग्णांसाठी विविध औषधी उपयोगांबाबत अशा प्रकारच्या प्रकल्पामुळे जनजागृती होईल असं डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची भारतीय एकात्मिक औषध संस्था आणि इंडस स्कॅन यांच्या दरम्यान वैज्ञानिक करारावर स्वाक्षरी होणे केवळ जम्मू-काश्मीरसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक असून यामुळे आतापर्यंत परदेशातून निर्यात कराव्या लागणाऱ्या औषधांची निर्मिती करण्याची क्षमता निर्माण होईल असं डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. अशा प्रकारच्या प्रकल्पामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये गुंतवणुकीला मोठ्या चालना प्रमाणावर मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अफू ही एक विस्मयजनक वनस्पती असून त्याच्यापासून बनवलेल्या मळमळ आणि वांतीवरील उपचारांसाठी मारिलनॉल/नॅबिलोन आणि सेसामेट, मज्जातंतूंच्या वेदना आणि मेंदूच्या पक्षाघातासाठी सेटिव्हेक्स, एपिडिओलेक्स, अपस्मारासाठी कॅनाबिडिओल या औषधांना अन्न आणि औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे, ज्यांचा वापर इतर देशात केला जात आहे अशी माहिती डॉ. सिंह यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content