Homeब्लॅक अँड व्हाईटएमडी 2 जातीच्या...

एमडी 2 जातीच्या अननसाची पहिली खेप संयुक्त अरब अमिरातीत

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत येत असलेल्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने म्हणजेच अपेडाने संयुक्त अरब अमिरातीला एमडी 2 जातीच्या अननसाची पहिली खेप नुकतीच यशस्वीरित्या निर्यात केली.

या निर्यातीअंतर्गत उच्च मूल्य असलेले 8.7 मेट्रिक टन इतक्या वजनाचे (650 पेट्या) एमडी 2 जातीच्या अननसाची खेप रवाना केली गेली. प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी, निर्यात वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न पदार्थ निर्यात विकास प्राधिकरण तसेच केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेअंतर्गतच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अनेक वरिष्ठ अधिकारीदेखील उपस्थितीत होते.

ही निर्यात म्हणजे भारताच्या कृषी निर्यातीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे, या निर्यातीमुळे सर्वोत्तम गुणवत्तेच्या अननसाचे उत्पादन घेऊन त्याचा जागतिक बाजारपेठेला पुरवठा करण्याच्या आपल्या क्षमतेचे दर्शन घडून आले आहे, अशी भावना अभिषेक देव यांनी यावेळी व्यक्त केली. असे दर्जेदार अननस संयुक्त अरब अमिरातीच्या बाजारपेठेत उपलब्ध करून देताना आमचा उत्साहदेखील द्विगुणीत झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

अननसाचे एमडी 2 हे वाण त्याचा असाधारण गोडवा आणि कमालीच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. एमडी 2 अननस, ज्याला “गोल्डन राईप” किंवा “सुपर स्वीट” असेही म्हटले जाते, ते अननस कोस्टा रिका, फिलीपिन्स आणि थायलंडसारख्या देशांमध्ये लक्षणीय लागवडीसह अननस उद्योगात सुवर्ण मानक बनले आहे.

भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर), केंद्रीय तटीय कृषी अनुसंधान संस्थान (सीसीएआरआय)ने महाराष्ट्रातील कोकण विभागातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात उत्पादित एमडी 2 अननसासाठी कापणीपश्चात व्यवस्थापन आणि सागरी प्रोटोकॉलच्या विकासासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य प्रदान केले. त्याचबरोवर एका खाजगी कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांच्या भागीदारीत 200 एकरांवर हे वाण यशस्वीरीत्या वाढवले. त्यामुळे याच्या चांगल्या दर्जाची आणि उत्पन्नाची खात्री झाली.

नवी मुंबईत पनवेलमध्ये या अननसांची बारकाईने प्रतवारी, वर्गवारी, पॅकिंग आणि साठवणूक करण्यात आली. तेथून संयुक्त अरब अमिरातीला पाठवण्यासाठी हे उत्पादन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे नेण्यात आले.

भारतातून ताजी फळे आणि भाज्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाचे समर्पित प्रयत्न नेहमीच सुरु असतात. एमडी 2 अननसाची ही पहिली प्रायोगिक निर्यात खेप निर्यातीतील भरीव वाढीची निर्देशक असून यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची उपस्थिती वाढण्यास मदत होईल.

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content