मुंबईच्या विश्वभरारी फाउंडेशन आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साठ्ये महाविद्यालयात शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडे दहा वाजता रानकवी ना. धों. महानोर यांच्या साहित्यावर आधारित ‘महानोरांचे साहित्य संचित’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये ना. धों. महानोर यांच्या गाजलेल्या कविता, रानगाणी, त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या संपर्कातील मान्यवरांच्या आठवणी यामधून त्यांना आदरांजली वाहिली जाईल.
याप्रसंगी कवी अरुण म्हात्रे आपल्या कवी, गायक, वादक साथीदारांसह महानोरांच्या काही कविता आणि गाणी सादर करतील. प्रमुख वक्ते म्हणून पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, कवी-लेखक रवींद्र

आवटी, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, डॉ. कृष्णा नाईक, कवी-अभिनेता प्रकाश राणे, गुरुनाथ तेंडुलकर, प्रशांत राऊत, अशोक शिंदे, संपदा पाडगावकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समीर जाधव करतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

