Saturday, July 27, 2024
Homeकल्चर +मुस्लिम मराठी साहित्य...

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फरझाना इक्बाल

गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत राहिलेल्या आणि विविध संस्था तसेच व्यासपीठांवरून साहित्यिक कार्याला सिद्ध करणाऱ्या मुंबईस्थित फरझाना इक्बाल-डांगे यांची नागपूर येथे १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय मुस्लिम परिषद, डॉ. मेघनाथ साहा सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकरी विचार मंच आणि छवि पब्लिकेशन्स या संस्थांमार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रा. जावेद पाशा, प्रा. रमेश पिसे, डॉ. असलम बारी, डॉ. वहिद पटेल आदी मान्यवर निमंत्रित आहेत. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित करण्यात आले आहे.

फरझाना  म. इकबाल डांगे ह्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या एम.ए. अर्थशास्त्र पदवीधर असून त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेच्या त्या माजी अध्यक्ष आणि सध्या मुंबई जिल्ह्याच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा साहित्यिक व इतर क्षेत्रातील सेवेबद्दल सन्मान करण्यात आला आहे. सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या संस्थेतर्फे हमीद दलवाई पुरस्कारानेही त्या सन्मानित आहेत.

त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या “फर्ज फाऊंडेशन”च्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग माजी कार्याध्यक्षा व सध्या जवाहर बालमंचच्या त्या महाराष्ट्राच्या समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. नाशिकच्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील कवयित्री संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली होती. आता नागपूर येथे भरणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल मराठी सारस्वत तसेच मुस्लिम समाजाकडून विशेषतः महिला वर्गाकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!