Homeमुंबई स्पेशलथोरातांच्या राजीनाम्याने प्रदेश...

थोरातांच्या राजीनाम्याने प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजीला नव्याने उधाण आले आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. आज त्यांचा वाढदिवसही होता. नाशिकमध्ये त्यांचे भाचे सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्याआधी सत्यजित यांचे वडील विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून मिळालेला एबी फॉर्म बाजूला ठेवत उमेदवारी दाखल केली नाही. त्याऐवजी तेथून सत्यजित यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. सत्यजित यांच्या उमेदवारीला बाळासाहेब थोरात यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा चालू होती. मात्र त्या काळात आणि आताही थोरात यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते प्रत्यक्ष कोठेही, कोणत्याही व्यासपीठावर दिसून आले नव्हते व नाहीत.

बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवशी काहीतरी विशेष घडेल अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. आज सकाळीच थोरात यांनी विधिमंडळ काँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याचे स्पष्ट झाले. पुण्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतः या राजीनाम्याला पुष्टी दिली.

दरम्यान, या राजीनाम्यावरून उद्भवलेल्या परिस्थितीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबद्दल पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या नवी दिल्लीला रवाना होत असल्याचे कळते. थोरात यांनी राजीनामा दिल्याचे आणि त्या राजीनामापत्रात आपल्यावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल कोणतीही माहिती आपल्याला नसल्याची पटोले यांनी सांगितले. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील हेसुद्धा मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेऊन पक्षांतर्गत गटबाजी थोपवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content