Homeटॉप स्टोरीम्हाडा परीक्षेची फी...

म्हाडा परीक्षेची फी मिळणार परत, पुढची परीक्षाही फुकट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज होणारी म्हाडाची परीक्षा रद्द केल्यामुळे एक लाखांहून अधिक विद्यार्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थांना मनःस्ताप झाला. सर्व विद्यार्थांची आपण मनापासून माफी मागतो. या सर्व विद्यार्थांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे. त्याशिवाय, पुढील परीक्षेला त्यांच्याकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही. यापुढे म्हाडा स्वत: प्रश्नपत्रिका तयार करेल, असे आव्हाड यांनी जाहीर केले.

आव्हाड यांनी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास ट्विट करून आज, रविवारी व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर केले. तोपर्यंत एसटीच्या अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेल्या अनेक विद्यार्थांनी परीक्षा केंद्रांच्या दिशेने वाटचालही केली होती. परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या आधी केंद्रांवर या विद्यार्थ्यांना परीक्षाच रद्द झाल्याचे समजले. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचा तीव्र संताप व्यक्त झाला.

म्हाडा

दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी यावर स्पष्टीकरण दिले. म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता. पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी पेपरफुटीतील टोळीला पकडले. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींच्या संवादात म्हाडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झाला होता. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हे समजल्यानंतर त्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले.

जानेवारीत होणार परीक्षा

आज म्हाडासाठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधि सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात 50 हजार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असेदेखील जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! – देवेंद्र फडणवीस

आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच! पण, सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर केला आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content