Homeमुंबई स्पेशलमुंबईचे माजी महापौर...

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांचे आज मध्यरात्री दोनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. आज संध्याकाळी चार वाजता सांताक्रुज टीचर्स कॉलनी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुसबे हे त्यांचे जन्मगाव. सिंधुदूर्ग जिल्ह्यातच त्यांचं बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुईया महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. सांताक्रुजच्या राजे संभाजी विद्यालयात त्यांनी मुख्याध्यापक म्हणूनही काम केले. घाटकोपरच्या पंतनगर तंत्रशिक्षण विद्यालयात त्यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापनही केले. 2002 साली त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाचा राजीनामा दिला आणि ते पूर्णवेळ सक्रिय राजकारणात उतरले. गेले 40 वर्षे ते पूर्वीच्या शिवसेनेत कार्यरत होते. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष, स्थायी समितीचे सदस्य अशी पदे भुषविल्यानंतर मार्च 2017 ते नोव्हेंबर 2019 या काळात ते मुंबईचे महापौर होते.

आज दुपारी दोन वाजता महाडेश्वर यांचे पार्थिव सांताक्रुज पूर्वच्या पटेल नगर सर्विस रोडवरील राजे संभाजी विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी चार वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content