मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला तर सुयोग कुंडलकर संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७७००९९४४९५, २४३०४१५०